सात सोप्या स्टेप्स घेऊन तुम्हींच बनू शकता तुमच्या जीवनाचा कोच
तुमच्या लाईफ मधला एखादा मोठा निर्णय घेताना कन्फ्युज होत आहात का? तुमच्या आयुष्यात होत असलेले चेंजेस सहज, सोप्या पद्धतीने स्वीकारायला तुम्हाला अवघड जातय का ? फॅमिली आणि करिअर याचा बॅलन्स कसा ठेवायचा याचे उत्तर सापडत नाहीय ? या आणि लाईफमधल्या अशा कितीतरी गोष्टी सेल्फ कोचिंग टेक्निकने सहजपणे शक्य होतात. तुमच्या लाईफ मध्ये काहीतरी मोठा बदल घडत असतो आणि आता पुढे काय ह्याची तुम्हांला अनिश्चितता वाटत असते तेव्हा सेल्फ कॉचींग टेक्निक वापरून तुम्ही तुमच्या लाईफचा कंट्रोल तुमच्या हातात घेऊ शकता. कसा, ते मी तुम्हांला माझ्या ह्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा. मी किर्ती मिलिंद सहानी तुमची सेल्फ कोचिंग कोच. येत्या तीन वर्षात कमीत कमी 10000 व्यक्तींना सेल्फ कोचिंग टेक्निक शिकवून त्यांचं लाईफ अधिक आनंदी, संतुलित, समाधानी आणि अधिक प्रॉडक्टिव बनवण्याचा माझा ध्यास आहे. तुमच्या लाईफ मध्ये तुमची प्रगती कुठेतरी खुंटल्यासारखी झाली आहे. आनंदी, उत्साही कसं राहावं तेच तुम्हाला समजत नाहीये आणि त्यामुळे तुम्हांला उदासीन, निराधार...