सेल्फ कोचिंगची 10 यशस्वी धोरणे जी बनवतात तुम्हांला पीक परफॉर्मर (भाग 1)
तुम्ही तुमच्या अनुभवांतून किती चांगलं शिकता? तुमच्या लाईफमध्ये सुधारणा करण्याबद्दल किती बरं उत्सुक असता ? कुणी तुमची एखादी सवय बदलायला सांगितली, तर किती बरं सहजपणे मान्य करून त्याच्यावर काम करायला सुरुवात करता? खरं तर दुसरा कुणीही तुम्हांला काहीही शिकवू शकत नाही. तुम्ही निरनिराळ्या शिक्षक किंवा प्रशिक्षकांकडून, वेगवेगळ्या पुस्तकांमधून फक्त माहिती घेऊ शकता पण जोपर्यंत ते ज्ञान तुम्ही स्वतःच्या योग्य बनवत नाही तोपर्यंत त्याचा काहीच उपयोग नाही. तुमच्या गरजांप्रमाणे तुमचे ज्ञान, वेगवेगळ्या विषयांमधली तुमची माहिती जर तुम्ही स्वतःला वापरायला शिकवलीत तरच तुम्हीं तुमच्या लाईफमध्ये त्याचा प्रभाव पाडू शकाल. तुमची स्वतःला शिकवण्याची जी कला असते तिला सेल्फ कोचिंग म्हणतात. तुम्ही मिळवलेल्या माहितीला अर्थपूर्ण आणि सकारात्मक दृष्टिकोनातून तुमच्या लाईफमध्ये जर वापरलंत तर ते एक परिमाणकारक, प्रभावी सेल्फ कोचिंग म्हणता येईल. त्याबरोबरच तुम्हांला यशस्वी सेल्फ कोच म्हणता येईल. तुमच्या लाईफमध्ये अधिक प्रगती होण्यासाठी तुम्ही स्वतःला नियमितपणे जेव्हा नवीन गोष्टी शिकवता त्यासाठी तुम्हांला सेल्फ कोचिंग...