सेल्फ कोचिंगची 10 यशस्वी धोरणे जी बनवतात तुम्हांला पीक परफॉर्मर (भाग 1)
तुम्ही तुमच्या अनुभवांतून किती चांगलं शिकता? तुमच्या लाईफमध्ये सुधारणा करण्याबद्दल किती बरं उत्सुक असता ? कुणी तुमची एखादी सवय बदलायला सांगितली, तर किती बरं सहजपणे मान्य करून त्याच्यावर काम करायला सुरुवात करता?
खरं तर दुसरा कुणीही तुम्हांला काहीही शिकवू शकत नाही. तुम्ही निरनिराळ्या शिक्षक किंवा प्रशिक्षकांकडून, वेगवेगळ्या पुस्तकांमधून फक्त माहिती घेऊ शकता पण जोपर्यंत ते ज्ञान तुम्ही स्वतःच्या योग्य बनवत नाही तोपर्यंत त्याचा काहीच उपयोग नाही. तुमच्या गरजांप्रमाणे तुमचे ज्ञान, वेगवेगळ्या विषयांमधली तुमची माहिती जर तुम्ही स्वतःला वापरायला शिकवलीत तरच तुम्हीं तुमच्या लाईफमध्ये त्याचा प्रभाव पाडू शकाल. तुमची स्वतःला शिकवण्याची जी कला असते तिला सेल्फ कोचिंग म्हणतात. तुम्ही मिळवलेल्या माहितीला अर्थपूर्ण आणि सकारात्मक दृष्टिकोनातून तुमच्या लाईफमध्ये जर वापरलंत तर ते एक परिमाणकारक, प्रभावी सेल्फ कोचिंग म्हणता येईल. त्याबरोबरच तुम्हांला यशस्वी सेल्फ कोच म्हणता येईल.
तुमच्या लाईफमध्ये अधिक प्रगती होण्यासाठी तुम्ही स्वतःला नियमितपणे जेव्हा नवीन गोष्टी शिकवता त्यासाठी तुम्हांला सेल्फ कोचिंग टेक्निक्स वापरण्याची गरज असते. तुम्ही जेव्हा तुमच्या वैयक्तिक किंवा व्यवसायिक आघाड्यांवर तुमच्या कार्यक्षमतेचा उच्चांक गाठण्यासाठी यशाचे काही ठोकताळे स्वतःच वापरता तेव्हा त्यांना 'पिक परफॉर्मरची ( सर्वोच्च कामगिरी करणारा) यशस्वी धोरणे' म्हटलं जातं.
तुमच्या व्यावसायिक आणि रोजच्या जीवनात कार्यक्षमतेचा उच्चांक गाठण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सेल्फ कोचिंग टेक्निकच्या दहा यशस्वी धोरणांपैकी 5 हमखास यश देणारी धोरणे मी तुम्हांला माझ्या ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. जी वापरून तुम्ही स्वतःलाच पीक परफॉर्मर बनवू शकता. तर माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.
मी किर्ती मिलिंद सहानी तुमची सेल्फ कोचिंग कोच. येत्या तीन वर्षात कमीत कमी दहा हजार व्यक्तींना सेल्फ कोचिंग टेक्निक्स शिकवून त्यांचं लाईफ अधिक आनंदी, समाधानी, संतुलित आणि अधिक प्रॉडक्टिव बनवण्याचा माझा ध्यास आहे.
चला तर पाहूया सेल्फ कोचिंगची 5 यशस्वी धोरणे जी वापरून तुम्ही बनू शकता पीक परफॉर्मर.
1. स्वतःचा विकास घडवण्याची तयारी असणे:
तुम्ही हा ब्लॉग इथपर्यंत वाचत आहात म्हणजे नक्कीच तुमच्या प्रगतीसाठी तुम्ही उत्सुक आहात. ही स्व-विकासाची (Self Development) तुमची इच्छा ही तुमच्या पूर्वानुभवांतून निर्माण होते. स्वयम् प्रशिक्षकास (Self Coach) जेव्हा स्वतःची व्यावसायिक प्रगती घडवायची इच्छा असते तेव्हा त्याची वैयक्तिक प्रगती (Self Growth) ही त्यात अगदी गरजेची असते. तुम्ही जर स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणत असाल तर त्याचा फायदा सहाजिकच तुम्हाला तुमच्या लाईफच्या प्रत्येक क्षेत्रात होतो. म्हणूनच स्वतःचा सर्वांगीण विकास घडवण्याची तयारी असणे क्रमप्राप्तच.
2. नवीन ज्ञानाचं मोकळ्या मनाने स्वागत करा:
झेन परंपरेप्रमाणे नवीन शिकण्यासाठी तुम्ही एक रिकामे पात्र असले पाहिजे. तसं असेल तरच तुम्ही नवीन ज्ञान,अनुभव,माहिती यांचे मोकळेपणाने स्वागत करू शकता. स्वयम् प्रशिक्षकाला (Self Coach) ही जाणीव असते कि नवीन शिकण्यासाठी नवनवे प्रयोग करणे गरजेचे असते. वेगवेगळ्या नवीन गोष्टींबद्दल वेगवेगळ्या नवीन दृष्टिकोनातून बघण्याची, काहीतरी नवीन शोधण्याची वृत्ती निर्माण करणे महत्त्वाचे असते. वेगवेगळे नवनवीन प्रयोग करण्याचा दृष्टिकोन, तुमच्या पूर्वानुभवांवर अवलंबून केलेल्या निर्णयांना निलंबित करण्याची व्यापकता या गोष्टी नवीन ज्ञान आणि आधुनिक दृष्टिकोन बनवायला मदत करतात.
3. बदलांमुळे स्वत्व गमावण्याची भीती न बाळगणे:
बऱ्याचदा लोकं लाईफमधल्या बदलांना घाबरतात. बदलांमुळे ज्या गोष्टी त्यांना त्याग कराव्या लागतात, वेगळ्या पद्धतीने हाताळाव्या लागतात त्यामध्ये आपलं व्यक्तिमत्व कुठेतरी हरवेल अशी भीती त्यांना वाटते. बऱ्याचदा लोकं स्वतःला खूप गांभीर्याने घेतात. स्वतःचं वागणं, आपली कामगिरी याबद्दल खूप कठोर आणि संकुचित भूमिका घेतात. त्यामुळे ते बदलांमुळे येणारे चढ-उतार सहज स्विकारू शकत नाहीत. स्वयम् प्रशिक्षक (Self Coach) मात्र नवीन शिकण्याच्या आणि बदलण्याच्या प्रक्रियेबद्दल नेहमीच सुरक्षित असतात. ते बदलांना सहजपणे स्वीकारतात.
4. चुकांना आनंदाने स्वीकारा :
स्वयम् प्रशिक्षक (Self Coach) नवीन गोष्टी शिकताना झालेल्या चुकांचा आनंद घेत शिकतात. त्यामुळे त्यांची शिकण्याची गतीही जलद असते. जे धीम्या गतीने शिकतात ते स्वतःला त्यांच्या प्रत्येक चुकीशी बांधून ठेवतात. तुम्ही तुमची कोणतीही चूक एक मोठं अपयश म्हणून जेव्हा पाहता, तेव्हा तुमच्या नकारात्मक भावना या तुमच्या चुकांबद्दलच्या प्रामाणिक अभिप्रायांना झाकोळतात. स्वयं प्रशिक्षक (Self Coach) त्यांच्या चुकांबद्दलच्या अभिप्रायांचे स्वागत करतात. स्वतःच्या चुकांना मोकळ्या मनाने निरपेक्ष भावनेने स्वीकारतात आणि त्यांच्या स्वतःच्या विकासासाठी या गोष्टींचा फायदा करून घेतात.
5. नवनिर्मितीचा शोध :
सर्वोच्च कामगिरी करणारे (Peak Performer) नेहमीच सर्जनशील आणि खेळकर वृत्तीने प्रत्येक अनुभवातून शिकत असतात. बदलांच्या प्रक्रियेला ते एका मजेदार दृष्टिकोनातून बघतात. सर्जनशीलते मुळे त्यांचे बरेच पर्याय वाढतात. स्वयम् प्रशिक्षकाला (Self Coach) हे ठाऊक असतं की नवीन वैयक्तिक वास्तविकता तपासण्यासाठी सर्जनशीलता एक प्रमुख मार्ग आहे.
ह्या आशा यशस्वी धोरणांचा वापर करून तुम्ही तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक लाईफमध्ये सर्वोच्च कामगिरीचा (Peak Performance) उच्चांक गाठण्याच्या दिशेने वाटचाल सुरू करू शकता. या वाटचालीत तुम्हांला आलेले अनुभव खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा.
तुमची ही वाटचाल अधिक यशस्वी करण्यासाठी लागणारी उर्वरित पाच यशस्वी धोरणे मी तुम्हांला माझ्या पुढील ब्लॉगमध्ये सांगणार आहे तर माझ्या पुढील ब्लॉगची जरूर वाट पहा.
माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनःपूर्वक आभार. माझा हा ब्लॉग तुम्हांला आवडल्यास लाईक, शेअर,कमेंट करा. माझ्या एफबी ग्रुप (https://www.facebook.com/groups/823092068235568/?ref=share) आणि एफबी पेजच्या (www.facebook.com/KirtiSelfCoach/ )लिंक वर क्लिक करा आणि सेल्फ कोचिंग टेक्निकच्या प्रवासात मला जॉईन करा.
धन्यवाद!







मस्तच कीर्ती छान लिखाण आहे self coach 🌹
उत्तर द्याहटवाThank you Shweta Tai
हटवाखुप सुन्दर blog
उत्तर द्याहटवाखुप छान वाटले वाचताना
अतिशय उपयुक्त व खुप मह्त्व पुर्ण टिप्स
पुढच्या blog ची वाट पाहतोय
Thank you Shraddha
हटवाखूप छान लिहला आहे किर्ती ताई एकदम उपयुक्त गोष्टी आहेत
उत्तर द्याहटवाThank you Maya Ma'am
हटवाखूपच सुंदर ब्लॉग लिहिला आहे किती ताई...
उत्तर द्याहटवाअतिशय उपयुक्त आणि सर्वांसाठी महत्त्वपूर्ण टिप्स...
Thank you Alka Tai
हटवाKhuach sundar blog, pictures are beautiful 👌
उत्तर द्याहटवाThank you Harshali
हटवाWonderful kirti
उत्तर द्याहटवाThank you Doc.
हटवाKhup sundar kirti tai.. Amazing blog
उत्तर द्याहटवाThank you Swati
हटवाGreat khoopach chan mahiti dili ahe🙏🙏
उत्तर द्याहटवाThank you Vidhya
हटवाNice information
उत्तर द्याहटवाThank you Madhura
हटवाखूप छान 👍🏻
उत्तर द्याहटवाThank you Sunita Tai
हटवाImpressive, images very good,content relevant. You are a pro.
उत्तर द्याहटवाThank you Manjusha Ma'am
हटवाYou are great Kirti tai very useful information
उत्तर द्याहटवाThank you so much 🙏🏻
Thank you Pallavi
हटवाKhup sundar blog Kirti tai
उत्तर द्याहटवाThank you so much
हटवाखूपच छान मॅडम! आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी ही धोरणं आत्मसात करणं खूप महत्त्वाचे! मोलाचे मार्गदर्शन!
उत्तर द्याहटवाToo good. छान content आणि सुंदर images
उत्तर द्याहटवाThank you Swati
हटवाKirti खूप छान points monadle ahet.
उत्तर द्याहटवाThank you Pradnya
हटवाEnergized vatla.. Interesting Title..
उत्तर द्याहटवा