4 महत्त्वाचे घटक जे वाढवतात तुमची आंतरिक प्रेरणा
तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हांला प्रोत्साहन मिळणे म्हणजेच मोटिवेशन किंवा प्रेरणा. प्रेरणा ही एक अशी प्रक्रिया आहे जी तुम्हांला एखाद्या ध्येयप्राप्तीच्या वाटेवरच्या प्रवासात मार्गदर्शन करते. तुम्हांला ॲक्शन घ्यायला उत्तेजन देते. तुम्हांला विशिष्ट मार्गाने कार्य करण्याचे कारण प्रदान करते. विशिष्ट कार्य करण्यास किंवा विशिष्ट गोष्ट साध्य करण्यास प्रवृत्त करते. एखादी गोष्ट करण्यासाठी परिस्थिती निर्माण करते.
जर तुम्ही तुमच्या कर्तृत्वाच्या वाटेवर ध्येय साध्य करण्यासाठी वाटचाल सुरू केली असेल तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या प्रेरणेमागे एक विशिष्ट उद्देश(specific purpose) आहे. हा विशिष्ट उद्देशच तुमच्या प्रेरणेचा सर्वात महत्त्वाचा घटक(important factor)आहे, ज्यामुळे तुम्ही कठोर परिश्रम करण्यास प्रवृत्त होता किंवा तुमच्या लाईफमधील सर्वात मोठी इच्छा प्राप्त करण्याचे मार्ग शोधता. विशिष्ट हेतू किंवा उद्देश असणे खूप महत्त्वाचे असते कारण जेव्हा तुम्हाला अर्थपूर्ण उद्देश सापडतो तेव्हा तो एक जोर(Force) निर्माण करतो ज्यामुळे तुम्ही पुढे ढकलले जाता किंवा मागे खेचले जाता.
प्रेरणा ह्या आंतरिक (INTRINSIC) आणि बाह्य (EXTRINSIC) अशा दोन प्रकारच्या प्रेरणांमध्ये( MOTIVATION) विभाजित करता येतात. या दोन प्रकारांच्या प्रेरणा सकारात्मक (POSITIVE) आणि नकारात्मक(NEGATIVE) या दोन प्रकारांद्वारे प्रभावित (influenced) होतात.
सर्व प्रकारच्या प्रेरणांमध्ये एखाद्या व्यक्तीची इच्छा, हेतू आणि परिणाम हे सामान्य विभाजक( factors) असतात. आंतरिक आणि बाह्य या दोन्ही प्रकारच्या प्रेरणा, प्रोत्साहन(encouragement) आणि बक्षीस (reward) मिळण्यासाठी उपयोगी पडतात. या दोन्ही प्रकारच्या प्रेरणा समाजातल्या सर्व स्तरातल्या, सर्व वयोगटातल्या लोकांवर परिणाम करतात. आंतरिक(INTRINSIC) आणि बाह्य(EXTRINSIC) प्रेरणा(MOTIVATION) या दोन्ही प्रेरणा कधीकधी स्वतंत्रपणे किंवा कधी एकमेकांबरोबर ही अस्तित्वात असू शकतात.
बऱ्याच परिस्थितींमध्ये आंतरिक प्रेरणा अधिक अनुकूल असते कारण ती ऐच्छिक असते, तिला सक्तीची आवश्यकता नसते आणि ती व्यक्तीला अधिक वेगवान बनवते. तसेच आंतरिक प्रेरणा असलेले लोक अधिक सहकारशील (cooperative) असतात, कमी स्पर्धात्मक असतात.आंतरिक प्रेरणेमुळेच व्यक्ती एखाद्या विषयातील आपला रस अधिक काळापर्यंत टिकवू शकते. बहुतेकदा, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या सर्व मूलभूत गरजा पूर्ण केल्या जातात तेव्हा आंतरिक प्रेरणा तयार होते.
याविरुद्ध बाह्य प्रेरणा(EXTRINSIC MOTIVATION) बऱ्याचदा व्यक्तीला अधिक स्पर्धात्मक(Competitive) बनवते. बक्षिसासाठी(reward) अधिक आक्रमक(aggressive)बनवते. बऱ्याचदा काही बक्षिसेही टिकाव धरत नाहीत. त्यांना काळाची मर्यादा असते आणि बऱ्याच वेळा काही बक्षिसांचे मूल्य देखील काळानुसार कमी होते. बाह्य प्रेरणेसाठी विशिष्ट वर्तन करण्याची बाह्य पुरस्कार(reward) किंवा हेतू(purpose) असण्याची आवश्यकता असते.
आंतरिक प्रेरणेला उत्तेजन(reinforcement) देणारे घटक(factors) कसे कार्य करतात आणि ते कसे फायदेशीर(beneficiary) ठरू शकतात हे जाणून घेणे उपयुक्त ठरेल. हे घटक आपल्याला आपली आंतरिक प्रेरणा (INTRINSIC MOTIVATION) उच्च पातळीवर नेण्यास अधिक सुसज्ज करतील.
आंतरिक प्रेरणा(INTRINSIC MOTIVATION) जास्तीत जास्त वाढवण्यासाठी उपयोगी पडणारे चार महत्त्वाचे घटक:
1. आव्हान:
आंतरिक प्रेरणा वाढवण्यासाठी आवश्यक असलेला सगळ्यात महत्वाचा पहिला घटक म्हणजे आव्हान. तुमच्या उद्दिष्टांमध्ये एक प्रकारचे आव्हान निर्माण करणे खूप महत्त्वाचे आहे मगच ते विशिष्ट ध्येय साध्य करण्याची प्रक्रिया अवलंबली जाते. जेव्हा तुम्ही ते ध्येय गाठण्यासाठी प्रत्येक अडथळ्यांवर विजय मिळवता तेव्हा तुमचा आत्मविश्वास नक्कीच द्विगुणित होतो.
2.कुतूहल:
नवीन गोष्ट शिकण्यासाठी आणि त्यांच्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी तुमची आंतरिक प्रेरणा जास्तीत जास्त वाढविण्याचा दुसरा घटक म्हणजे कुतूहल. जेव्हा तुमच्या सभोवतालच्या शारीरिक वातावरणातील एखादी गोष्ट तुमचे लक्ष वेधून घेते (Sensory Curiosity) किंवा एखादी क्रिया तुम्हाला अधिक जाणून घेण्यासाठी उत्तेजित करते (Cognitive Curiosity) तेव्हा असे होते.
3. नियंत्रण:
तिसरा घटक आहे नियंत्रण. तुमची जी स्वतःवर आणि वातावरणावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता असते ती तुम्हांला तुमची आंतरिक प्रेरणा वाढवण्यास मदत करते. हे नियंत्रणच तुम्ही कुठल्या गोष्टीचा पाठपुरावा करता ते ठरवते.
4. सहकार आणि स्पर्धा:
दुसऱ्यांना सहकार्य करून मिळणारे समाधान किंवा तुमच्या भागीदाराच्याबरोबर एकमेकांना आधार देऊन एक सामायिक ध्येय (Common Goal) प्राप्त केल्याचं समाधान हे तुमच्या आंतरिक प्रेरणेचा एक महत्त्वाचा घटक आहे. तुमची कौशल्ये आणि कार्यक्षमता यांची इतरांबरोबर तुलना करून तुमची स्वतःची प्रगती मोजण्याचा आनंद आणि समाधान देखील असेच असू शकते.
तुमच्या आंतरिक प्रेरणा पोषक बनवा.
आता तुम्हांला आंतरिक प्रेरणांमध्ये(INTRINSIC MOTIVATION) योगदान देणारे मुख्य घटक माहीत आहेत. त्यांना उच्च पातळीवर नेण्यासाठी तुम्ही प्रत्येक घटकांचे पालन-पोषण करण्यावर भर देऊ शकता. एकदा तुम्ही तुमच्या आंतरिक प्रेरणेस पोषण दिलेत की तुम्ही बाह्य प्रेरणांवर कमी अवलंबून राहू शकाल. काहीतरी साध्य करण्यासाठी तुमची चिकाटी आणि तुमचा ड्रायव्हिंग फोर्स(आंतरिक प्रेरणा) वाढवणे या अतिशय गरजेच्या गोष्टी आहेत.तुम्हांला बक्षीसासाठी (reward), मान्यतेसाठी बाह्य स्त्रोतांवर अवलंबून राहण्याची गरज नाही हे तुमच्या ध्यानात आलं कि तुम्हांला अधिक स्वातंत्र्य देखील मिळेल आणि ही गोष्ट निश्चितच खूप समाधानकारक असेल.
माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनःपूर्वक आभार! माझा ब्लॉग तुम्हांला आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा.
तुमचे सर्वोत्तम जीवन जगण्यासाठी, तुमच्या संपूर्ण कौशल्यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी जर तुम्हाला तुमच्या आंतरिक प्रेरणा जागृत करण्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर अंतर्मनाच्या गुजगोष्टी ह्या माझ्या
FB Page: www.facebook.com/KirtiSelfCoach/
FB Group : https://www.facebook.com/groups/823092068235568/?ref=share
च्या लिंक वर नक्की क्लिक करा आणि सेल्फ कोचिंगच्या प्रवासात मला जॉईन करा.
धन्यवाद!







Jabardasta, sunder Photo khupach chhan writting
उत्तर द्याहटवाKhup chhan kiti Tai
उत्तर द्याहटवाKhup sundar point sangitale aahet...
Excellent 👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर
उत्तर द्याहटवाअतिशय सोप्या व साध्या भाषेतून केलेले ओघवती लिखाण
मस्त
उत्तर द्याहटवाSuperb blog intrinsic and extrinsic motivation in depth information.keep writing
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेखण
उत्तर द्याहटवाखूपच छान अप्रतिम...!
उत्तर द्याहटवाखूपच छान कीर्ती 🌹🌹
उत्तर द्याहटवाKhup chan blog Tai 👍👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद वैशाली
हटवाSuper mam
उत्तर द्याहटवाधन्यवाद सोनिया मॅडम
हटवाSuper mam
उत्तर द्याहटवाSuper mam
उत्तर द्याहटवाPowerful
उत्तर द्याहटवा