3 उपयुक्त टिप्स वापरून करा तुमच्या ANXIETY (चिंता) वर मात
आई, औषध-गोळ्या घ्यायला कशी ग विसरतेस? मुलांनो, परीक्षा जवळ आली तरी नियमित अभ्यास कसा नाही करत तुम्ही? उद्या ऑफिस मध्ये प्रेझेंटेशन द्यायचे आहे, होईल का व्यवस्थित सगळं?आवडेल का सगळ्यांना माझं काम? ह्या महिन्याचे टारगेट होईल का पूर्ण? अशा एक ना धड अनेक चिंता करता की नाही तुम्ही रोजच्या लाईफमध्ये? आपण सगळेच आपल्या आयुष्यात कधी ना कधी तरी चिंता करतो. तसं बघितलं तर नवीन घर घेणे, मुलांच्या ऍडमिशन, जॉब बदलणे, आर्थिक टंचाई अशा लाईफमधल्या बऱ्याचशा तणावपूर्वक प्रसंगांना 'ANXIETY' म्हणजे 'चिंता' हा आपला नैसर्गिक प्रतिसाद असतो. ह्याच चिंतेमधून मुक्त कसं होता येईल हेच मी सांगणार आहे तुम्हांला माझ्या आजच्या ह्या ब्लॉगमध्ये.तर माझा हा ब्लॉग शेवटापर्यंत वाचा. मी किर्ती मिलिंद सहानी तुमची सेल्फ कोचिंग कोच. येत्या तीन वर्षात कमीत कमी दहा हजार व्यक्तींना सेल्फ कोचिंग टेक्निक्स शिकवून त्यांचं लाईफ अधिक आनंदी, समाधानी, संतुलित आणि अधिक प्रॉडक्टिव्ह बनवण्याचा माझा ध्यास आहे. तर भविष्यात होऊ घातलेल्या गोष्टींच्या संभाव्य परिणामांबद्दल एक अनामिक भीती अनुभवणे म्हणजेच ANXIETY किंवा चिं...