3 उपयुक्त टिप्स वापरून करा तुमच्या ANXIETY (चिंता) वर मात
आपण सगळेच आपल्या आयुष्यात कधी ना कधी तरी चिंता करतो. तसं बघितलं तर नवीन घर घेणे, मुलांच्या ऍडमिशन, जॉब बदलणे, आर्थिक टंचाई अशा लाईफमधल्या बऱ्याचशा तणावपूर्वक प्रसंगांना 'ANXIETY'म्हणजे 'चिंता' हा आपला नैसर्गिक प्रतिसाद असतो. ह्याच चिंतेमधून मुक्त कसं होता येईल हेच मी सांगणार आहे तुम्हांला माझ्या आजच्या ह्या ब्लॉगमध्ये.तर माझा हा ब्लॉग शेवटापर्यंत वाचा.
मी किर्ती मिलिंद सहानी तुमची सेल्फ कोचिंग कोच. येत्या तीन वर्षात कमीत कमी दहा हजार व्यक्तींना सेल्फ कोचिंग टेक्निक्स शिकवून त्यांचं लाईफ अधिक आनंदी, समाधानी, संतुलित आणि अधिक प्रॉडक्टिव्ह बनवण्याचा माझा ध्यास आहे.
कधी कधी चिंता करणे हा आयुष्याचा अपेक्षीत भाग असतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीस लाईफमध्ये चिंताजनक घटकांचा सामना करावा लागतो तेव्हा चिंता करणे हे नुसतं नॉर्मलच नसते तर स्वतःच्या Survival साठी देखील आवश्यक असते. कामाच्या ठिकाणी, परीक्षेच्या आधी किंवा एखाद्या समस्येचा सामना करताना चिंताग्रस्त होणे हे परिस्थितीनुसार गरजेचे असते.
परंतु चिंताग्रस्त विकार (Anxiety Disorder) असलेल्या व्यक्तीला दाररोजच्या परिस्थितींबद्दल सतत अधिक जास्त चिंता, त्रास, भीती वाटत असते. अशा व्यक्तीची चिंता दूर होत नाहीच, उलट काळानुसार ती अधिक वाढते. चिंताग्रस्त विकारांची (Anxiety Disorder) लक्षणे ही एखाद्या व्यक्तीच्या रोजच्या दिनक्रमात अडथळे निर्माण करतात. उदा. ऑफिसमधला परफॉर्मन्स , शाळेतील प्रगती, नातेसंबंध इत्यादी.
सामान्य चिंता आणि चिंताग्रस्त विकार यामधील फरक वेळीच जाणून घेतला तर एखाद्या व्यक्तीला त्याच्या मनःस्थितीची ओळख पटवून घ्यायला आणि त्यावर योग्य उपचार करून घ्यायला मदत होते. नेहेमीच वैद्यकीय उपचारांची गरज असतेच अस नाही.
1. शक्यता असलेल्या सर्वात वाईट गोष्टींचा विचार करणे.
2.दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात ह्याबद्दल नकारात्मक कल्पना करणे.
3. भविष्यात काय होणार आहे ह्याबद्दल काहीही आधाराशिवाय नकारात्मक कल्पना करणे.
4. सगळ्या परिस्थिती सारख्याच असल्याची कल्पना करून एका परिस्थितीतले वाईट परिणाम सगळ्यांमध्ये अनुभवायला मिळतील हे गृहीत धरणे.
5. परिस्थितीबद्दल, लोकांबद्दल नेहेमी टोकाच्या भूमिका घेणे. टोकाच्या भूमिकांच्या शक्यतेचा विचार करणे.
चिंताग्रस्त विकाराने ( Anxiety Disorder) पिडीत व्यक्तीला बऱ्याच वेळा मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्याची गरज असते. परंतु सामान्य चिंता असलेल्या व्यक्तीच्या चिंतेमागील खरे कारण शोधून काढण्यावरच त्या व्यक्तीची चिंतामुक्ती अवलंबून असते.
चिंतामुक्त होण्यासाठी वापरायच्या 3 उपयुक्त टिप्स :
1. तुमची चिंता ही तुमची चूक नाही:
तुमची चिंता तुमच्यातला दोष नाही हे समजुन घेणं ही चिंतामुक्त होण्याची पहिली पायरी आहे. विविध चिंतांच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी तुमच्या जीवनावरील झालेल्या त्यांच्या परिणामांपासून दूर जाणं ही चिंतामुक्ततेची पहिली पायरी आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर सवयीप्रमाणे तुम्हांला देखील नकारात्मक पूर्वाग्रह असतात जे तुम्हांला जिवंत ठेवतात आणि संभाव्य धोक्यापासून वाचवतात. ही नकारात्मकता योग्य आणि चांगल्या कारणांसाठी आहे. ही नकारात्मकता तुमच्या अस्तित्वाचा मूलभूत भाग आहे आणि तिला जपून ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून तुमच्याबरोबर एखादा धोक्याचा प्रसंग किंवा आघात झाला तर अशा अतिशय गरजेच्या वेळी प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी ती तुमच्या ऊर्जेचा मजबूत स्रोत (Resource) म्हणून उपयोगी पडेल. तुमच्या बँकेतल्या खात्यात साठवलेल्या पैशाप्रमाणेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये या नकारात्मक चिंतेचा उपयोग केला जाऊ शकतो. परंतु आधुनिक जीवन पद्धतीमधील दबावामुळे या चिंतेला सतत चालना मिळते. तुमच्यामधल्या कॉर्टिसोलला (Stress Hormone) सतत चालना दिली जाते आणि तुम्हांला सतत संघर्ष किंवा तणावपूर्वक प्रसंगांना सामोरे जावे लागते. यामुळेच तुमची चिंता करण्याची सवय (Automatic Response) विकसित झालेली आहे. म्हणूनच चिंतेबद्दल स्वतःला दोषी ठरवणे योग्य नाही.
2.तुमच्या अवचेतन मनाची शक्ती ओळखा:
तुमचं अवचेतन मन (Subconscious Mind) खूप मोकळं आणि तुमच्या सूचना मान्य करणारं असतं. ते तुमच्या कल्पनेपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात तुमचं ऐकत. तुमची सामान्य चिंता, तुमच्या मनाची शांती आणि तुमचा आत्मविश्वास ह्या गोष्टींवर तुमचे स्वतःचेच नियंत्रण असते. तुमच्या अवचेतन मनाच्या अत्यंत सहज परिणाम होण्याच्या स्वभावामुळे त्याच्याशी संवाद कसा साधता येईल हे शिकणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हांला असं वाटत असेल की तुमचं अवचेतन मन लहान मुलासारखे आहे आणि तुमचे जागृत मन (Conscious Mind) एखाद्या पालकासारखे आहे तर तुमच्या विचारांवर अवलंबून तुम्ही जे काही बोलता त्याचा एक तर भितीचा किंवा प्रेमाचा प्रतिसाद (Conditional Response) तयार होतो. अशावेळी तुम्ही तुमच्या लहान मुलाशी म्हणजेच अवचेतन मनाशी नक्कीच शांतपणे, मायेने आणि प्रेमाने वागता की नाही ?
अधिक सकारात्मक बनणे म्हणजे तुम्ही कोण आहात हे बदलणं नाही तर आधीपासून तुमच्या आत असलेल्या एका कोपऱ्यात प्रवेश करणे. या रीतीने तुम्ही तुमच्या उच्च स्व (Higher Self), बेस्ट सेल्फ आणि एक्झिक्युटिव्ह सेल्फ पर्यंत पोहोचू शकता. असा सेल्फ जो मुक्त आहे आणि लाईफ क्षणोक्षणी जगतो खऱ्या अर्थाने. म्हणूनच तुम्हांला खऱ्या अर्थाने जर चिंतामुक्त व्हायचं असेल तर तुम्हांला तुमच्या अवचेतन मनाला प्रोग्राम करावे लागेल ज्याने ते भीतीच्या ऐवजी प्रेमावर फोकस करेल.
3. स्वतःची काळजी घ्यायला सुरू करा:
तुमच्या चिंतांवर हमखास रामबाण उपाय म्हणजे स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात करणे. तुमचं शरीर हे त्याच्या गरजा पूर्ण करून घेण्यास चांगला प्रतिसाद देते आणि लवकरच निरोगी सेल्फ-केअर सवयींचा फायदा अनुभवते. काही कालावधीनंतर स्वतःला गरज असलेल्या गोष्टींची शरीराला भूक निर्माण होते (Craving). उदाहरणार्थ, तुम्ही नियमितपणे व्यायाम करायला लागलात तर काही दिवसांनी तुमच्या शरीराला व्यायामाची गरज भासेल म्हणजेच व्यायामाची भूक निर्माण होईल.
तुमच्या स्वतःची काळजी घेण्याचा एक विशिष्ट कार्यक्रम (Self-Care Program) निवडण्याची आणि त्याचा रोज वापर करण्याची आवश्यकता आहे, यावर जोर देणे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेता तेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता आणि स्वतःच्या गरजांचा पूर्णपणे आदर ठेवून त्यांना पूर्ण करता. यामुळे तुमच्या मनात प्रेम आणि करुणा निर्माण होते. तुमच्या शरीराला स्वतःच्या गरजा ओळखता येतात आणि तुम्ही तुमच्या शरीराच्या हालचालींची गती कमी केली तर तुम्हांला नक्की तुमच्या शरीराचा संदेश ऐकू येईल. रोज तुमच्या शरीराकडून मिळणारे संकेत (Signals) जरुर ऐका. तुमच्या शरीराबरोबर एक छान मनमोकळं नातं तयार करा. तुमच्या मनात आणि शरीरात निर्माण झालेल्या सुसंवादाने दोन्हींची भरभराट व्हायला मदत होईल.
वरील दिलेल्या 3 उपयुक्त टिप्स वापरून तुम्ही नक्कीच चिंतामुक्त होऊ शकता. परंतु कधीकधी अशा टिप्स वापरण्यासाठी देखील तुम्हांला कुणाची तरी साथ लागू शकते. ही साथ जर प्रोफेशनल असेल तर अधिकच चांगले. तुम्हांला अशा मदतीची गरज असल्यास 'अंतर्मनाच्या गुजगोष्टी' हा माझा एफ बी ग्रुप नक्की जॉईन करा आणि मला संपर्क करा.
FB Group Link: www.facebook.com/KirtiSelfCoach/
FB Page Link: https://www.facebook.com/groups/823092068235568/?ref=share
माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनःपूर्वक आभार हा ब्लॉग तुम्हांला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. सेल्फ कोचिंग टेक्निक्सबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी माझ्या पुढच्या ब्लॉगची वाट पहा.
धन्यवाद!
खूप छान टिप्स
उत्तर द्याहटवाThank you Swati
हटवाखरेच खूप उपयुक्त माहिती
हटवाKhup chhan
उत्तर द्याहटवाThank you so much
हटवाKirti mam खूपच informative blog. Very useful in today's scenario. Thanks for great tips.
उत्तर द्याहटवाThank you Bhakti
हटवाSuper Kirti super superb s
उत्तर द्याहटवाThank you so much
हटवाKirti kiti sundet mahiti dilis👍🌹
उत्तर द्याहटवाThank you Shweta Tai
हटवाखूपच छान 💐💐
उत्तर द्याहटवाThank you Vidhya
हटवाNice tips ma'am 👍👍
उत्तर द्याहटवाखूपच छान माहितीपूर्ण मार्गदर्शन
उत्तर द्याहटवाThank you Nehal
हटवाखूपच सुंदर ब्लोग ला आहे
उत्तर द्याहटवाधन्यवाद..!
Thank you Alka Tai
हटवाExcellent very nicely explain
उत्तर द्याहटवाThank you so much
हटवाExcellent. A complex emotion well explained.
उत्तर द्याहटवाThank you Milind
उत्तर द्याहटवाWah partner ,mast
उत्तर द्याहटवाThank you partner
हटवाKhupach chhan
उत्तर द्याहटवाThank you Poonam Tai
हटवावाह मस्त ब्लॉग
उत्तर द्याहटवाThank you Maya Ma'am
हटवाखूप सुंदर ब्लॉग लिहिला आहेस कीर्ती आणि सोल्युशन्स पण छान आहेत .
उत्तर द्याहटवाThank you Asmita
हटवाखूप छान कीर्ती ताई
उत्तर द्याहटवाTHANK YOU SO MUCH NITIN SIR
हटवा