सात सोप्या स्टेप्स घेऊन तुम्हींच बनू शकता तुमच्या जीवनाचा कोच

    

    तुमच्या लाईफ मधला एखादा मोठा निर्णय घेताना कन्फ्युज होत आहात का? तुमच्या आयुष्यात होत असलेले चेंजेस सहज, सोप्या पद्धतीने स्वीकारायला तुम्हाला अवघड जातय का ? फॅमिली आणि करिअर याचा बॅलन्स कसा ठेवायचा याचे उत्तर सापडत नाहीय ? या आणि लाईफमधल्या अशा कितीतरी गोष्टी सेल्फ कोचिंग टेक्निकने सहजपणे शक्य होतात. तुमच्या लाईफ मध्ये काहीतरी मोठा बदल घडत असतो आणि आता पुढे काय ह्याची तुम्हांला अनिश्चितता वाटत असते तेव्हा सेल्फ कॉचींग टेक्निक वापरून तुम्ही तुमच्या लाईफचा कंट्रोल तुमच्या हातात घेऊ शकता. कसा, ते मी तुम्हांला माझ्या ह्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.

मी किर्ती मिलिंद सहानी तुमची सेल्फ कोचिंग कोच. येत्या तीन वर्षात कमीत कमी 10000 व्यक्तींना सेल्फ कोचिंग टेक्निक शिकवून त्यांचं लाईफ अधिक आनंदी, संतुलित, समाधानी आणि अधिक प्रॉडक्टिव बनवण्याचा माझा ध्यास आहे.

   तुमच्या लाईफ मध्ये तुमची प्रगती कुठेतरी खुंटल्यासारखी झाली आहे. आनंदी, उत्साही कसं राहावं तेच तुम्हाला समजत नाहीये आणि त्यामुळे तुम्हांला उदासीन, निराधार वाटत असेल, सतत काळजी वाटत असेल तर हीच लक्षणं आहेत तुम्हांला  सेल्फ कोचिंग टेक्निकची गरज असण्याची. मात्र त्यासाठी तुम्हांला तुमच्या स्वतःमध्ये काहीप्रमाणात बदल घडवण्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल. तुम्ही लाईफमध्ये रोजच काहीना काही शिकत असता आणि तुमचे हेच अनुभव जर तुम्ही योग्य पद्धतीने वापरलेत तर तुम्ही  पुढे सांगितलेल्या सेल्फ कोचिंग टेक्निकच्या सात स्टेप्स वापरून तुमच्या लाईफमध्ये येणार्‍या अनिश्चित आणि कॉम्प्लिकेटेड परिस्थितीमधून मार्ग काढण्यासाठी स्वतःला सक्षम बनवू शकता.

1.  शांततेत बसा:

 या जगात तुमच्या स्वतःइतकं चांगलं तुम्हांला  कुणीच ओळखत नाही म्हणून रोज थोडावेळ स्वतःबरोबर वेळ घालवा. रोज सकाळी शांतपणे बसून तुमच्या मनात काय चाललंय त्याचा अंदाज घ्या. काय विचार येतात मनात तुमच्या त्यांच्याकडे वेळीच लक्ष द्या. काही प्रश्न विचारा स्वतःला, जसे की, कुठल्या दिशेने चाललय लाइफ सध्या, कुठले कुठले चॅलेंजेस येत आहेत समोर, कुठली एखादी गोष्ट बदलावीशी वाटते लाईफ मध्ये, काय आहे जे मिस करत आहात लाईफ मध्ये, अशाच काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी नियमित थोडासा वेळ शांततेत बसून आत्मपरीक्षण करा. 

2. लिहून काढा:

 तुमच्या खऱ्याखुऱ्या भावना, तुमचे वर्तमान विचार अगदी प्रामाणिकपणे लिहून काढा. जे मनात येईल ते, जसं मनात येईल  तसच्या तसं लिहून काढा. विसरू नका तुम्ही तुमच्या स्वतःशीच बोलताय त्यामुळे अगदी मोकळेपणे लिहून काढा. बऱ्याच वेळा तुमच्या मनातल्या गोष्टी वाचून तुमचं तुम्हांलाच आश्चर्य वाटेल. तुमच्या रोजच्या धावपळीच्या लाईफमध्ये लक्षच जात नाही तुमचं बऱ्याचदा स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधण्याकडे.

3. मार्ग ठरवा:

एकदा सगळं मनातलं लिहिलंत की तुमचं तुम्हांलाच समजेल की तुमच्या लाईफमधल्या कुठल्या एरियात तुम्हांला बदल हवा आहे, तुम्हाला काय साध्य करायचं आहे, स्वतःमध्ये काय सुधारणा केली पाहिजे तेही लक्षात येईल तुमच्या. तुम्ही लाईफमध्ये सध्या कुठे आहात आणि तुम्हांला कुठे जायचंय, कुठल्या पोझिशनला असायचय  आणि या दोन पॉईंटमध्ये  किती अंतर आहे या गोष्टींची जाणीव तुम्हांला होईल. तुम्हाला आत्तापर्यंत काय माहित आहे आणि अजून काय माहिती करायचय, काय बनायचय हे तुम्हांला समजेल. काय बदलायला हवं, त्यासाठी कसे प्रयत्न करायला हवेत याचं प्लॅनिंग तुम्हाला करता येईल आणि जर चेंजेस शक्यच नसतील तर वस्तुस्थिती जशी आहे तशीच ती  स्वीकारावी लागेल याची तुम्हाला नक्की जाणीव होईल. 

4. प्लॅन बनवा: 

एकदा तुम्हांला तुमच्या लाईफ मधल्या नक्की कुठल्या कुठल्या एरिया मध्ये बदल करायला हवा आहे हे समजलं की तुम्ही स्वतःला काही प्रश्न विचारू शकता. जसे की, तुमच्या लाईफ मध्ये सुधारणा होण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न करणार आहात, आत्ता सध्या काय प्रयत्न करत आहात,  तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला अजून कुठल्या वेगळ्या रस्त्यांचा वापर केला पाहिजे, अशा पद्धतीने विचार करून मनात जेवढे येतील तेवढे सगळे ऑप्शन्स मोकळेपणे लिहून काढा. घाबरू नका, हे फक्त विचार केलेले ऑप्शन्स आहेत. ह्यातले सगळेच वापरायचे आहेत असं नाही .

5. ठराविक आणि छोट्या ऍक्शन: 

  तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायला लागणाऱ्या सगळ्या एकशन्सची तुम्ही एक लिस्ट बनवा. त्या सगळ्या एकशन्स  कुठल्या ऑर्डरने घ्यायच्या आणि कधीपर्यंत घ्यायच्या ते सविस्तर ठरवा. स्वतःला विचारा की नक्की काय आणि कधीपर्यंत करणार आहात. जेव्हा तुम्ही तुमची ध्येय ठरवाल तेव्हा त्यांना पूर्ण करण्यासाठी एक निश्चित वेळ मर्यादित करा. तुमची ध्येय ही ठराविक, मोजता येण्यासारखी, साध्यकरता येण्यासारखी , तुमच्याशी निगडीत असलेली आणि कालमर्यादा असलेली  अशीच असावीत. यालाच SMART (स्मार्ट ) ध्येय असे म्हणतात. 

S म्हणजे SPECIFIC (ठराविक).   

M म्हणजे MEASURABLE (मोजता येण्यासारखी) 

A म्हणजे ACHIEVABLE (साध्यकरता येण्यासारखी) 

R म्हणजे RELEVANT ( तुमच्याशी निगडीत असलेले) 

T  म्हणजे TIME BOUND ( कालमर्यादा असलेले ) 

याचे एक सोपे उदाहरण म्हणजे,"पुढील दोन महिन्यात पाच किलो वजन कमी करण्यासाठी मी रोज पाच किलोमीटर चालत आहे." अशा पद्धतीने तुम्ही तुमचे ध्येय ठरवू शकता.

6. अडथळे ओळखा: 

तुमचं एखादं विशिष्ट ध्येय जेव्हा पक्क होतं त्यावेळी त्या ध्येयाच्या साध्य करण्याच्या वाटेत नक्की कुठल्या अडचणी, कुठले अडथळे येऊ शकतील आणि त्यावर तुम्ही कसे मात करू शकाल याचा विचार आधीच करून ठेवा. विचारा स्वतःला कि कुठल्या गोष्टीमुळे ठरवलेले ध्येय साध्य करणे कठीण होऊ शकते, तुमच्या स्वतःच्या अशा कुठल्या सवयी,विचार, वागणी आहेत की ज्यामुळे तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायला तुम्हांला त्रास होईलकुठल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या सगळ्या अडचणींवर मात कराल? त्यासाठी वेगवेगळ्या ऑपशन्सचा विचार करून स्वतःच्या अडथळ्यांवर तुम्ही नक्कीच मात करू शकाल. तुमची यशस्वी होण्याची शक्यता वाढेल. आधीच्या मुद्द्यात म्हटल्याप्रमाणे जर तुम्हाला पुढच्या दोन महिन्यात 5 किलो वजन कमी करायचं असेल तर तुम्हांला पार्टीला गेल्यावर सॅलॅड्स जास्त खाऊन तुमचं पोट भरलं पाहिजे म्हणजे जंक फूड खाण्याची तुम्हाला इच्छा होणार नाही. तसेच व्यायामासाठी रोज सकाळी लौकर उठून परत न झोपण्यासाठी तुमचं अलार्म क्लॉक तुम्हांला तुमच्या खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्यात ठेवलं पाहिजे .

7. अकाऊंटॅबिलिटी पार्टनर शोधा: 

 तुम्ही तुम्हांला स्वतःला तुमच्या ध्येयपूर्तीसाठी ठरवलेल्या ॲक्शनसाठी अकाऊंटेबल कसे ठरवणार?  त्यासाठी तुम्हांला  तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करायला सपोर्ट करणारी एक किंवा अनेक माणसे शोधून काढायची आहेत. ज्यांच्याशी तुम्ही तुमच्या  ध्येयाबद्दल, तुमच्या एकशन्स घेण्याच्या प्लॅनबद्दल चर्चा करू शकता. जे तुम्हांला तुमच्या प्लॅनप्रमाणे नियमित काम करायला प्रोत्साहन देतील आणि तुमच्या कामाचा रोज आढावा घेतील. तुमच्या प्लॅनप्रमाणे तुमची ऍक्शन झाली का याची नियमितपणे तुम्हाला विचारणा करण्याची जबाबदारी आणि अधिकार तुम्ही त्यांना देण्याची गरज आहे. कोण तुम्हांला  कशाप्रकारे मदत करेल तुमचा प्रभावी  अकाऊंटॅबिलिटी पार्टनर बनण्यासाठी या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्वतःलाच शोधायचे आहे.

तुमची ध्येय अशा ठिकाणी एका कागदावर लिहून लावा जिथे ती तुम्हाला दिवसातून बऱ्याचदा दिसतील. ती सारखी नजरे समोर असली कि तुम्हांला तुमची प्रगती मोजणं सोप्प होईल. ज्या ॲक्शनमध्ये तुम्ही काहीतरी चांगलं केलंय त्यात तुम्ही स्वतःला शाबासकी देऊ शकता. ज्या गोष्टी नाही जमल्या त्या सजगपणे स्वीकारून त्यावर त्याबद्दल पुन्हा नवी ध्येय बनवून कामाला लागू शकता. तुमच्या लाइफमधली सगळी ध्येय नेहमी लिहून काढत जा. तुमच्या प्रत्येक ध्येयासाठी ॲक्शन प्लॅन बनवून लिहून ठेवा आणि प्रत्येक ध्येयासाठी स्वतःला तीन प्रश्नांची उत्तरे विचारा.  

1. तुम्ही तुमच्या ध्येयपूर्तीसाठी काय करणार? 

2. तुम्ही तुमच्या ध्येयपूर्तीसाठी कधी करणार? 

3. तुम्ही स्वतःला जबाबदार कसे धरणार?


https://leaderchat.org/2017/06/20/coaching-yourself-6-tips-from-a-professional-coach/

आपल्या सगळ्यांच्याच लाईफमध्ये अशा परिस्थिती येतात ज्यात आपल्याला पुढे कसे जावे हेच समजत नाही आणि आपल्याला कुणाचीतरी मदत लागते. लाईफच्या अशा सिटूएशन्सचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करून स्वतःला अधिक आनंदी, संतुलित आणि अधिक प्रोडूक्टिव्ह बनवण्यासाठी वरील सांगितलेल्या सात स्टेप्स चा वापर करून तुम्ही स्वतः स्वतःचे मार्गदर्शक (कोच) बनू शकता. मग कसली वाट पहात आहात अजून? करा सुरुवात! करूनच दाखवा आता!!

माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनःपूर्वक आभार.  हा ब्लॉग तुम्हांला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट करा. सेल्फ कोचिंग टेक्निकबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या माझ्या एफबी पेजच्या लिंकवर क्लिक करा www.facebook.com/KirtiSelfCoach/


 धन्यवाद! 


टिप्पण्या

  1. कीर्ती खूप छान माहिती दिलीस
    Keep it up 👍👍💐

    उत्तर द्याहटवा
  2. खुप छान लिहिलं आहे! किरतीताई धन्यवाद

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

4 महत्त्वाचे घटक जे वाढवतात तुमची आंतरिक प्रेरणा