स्वतःला ओळखा : 9 शोधक प्रश्नांच्या मदतीने
खरं सांगा, लाईफमधल्या तुमच्या प्रगतीने तुम्ही नाखूष आहात का? कितीही प्रयत्न केले तरी म्हणावं तसं यश हाती लागत नाही का ? तुम्ही ज्याच्या प्रेमात पाडलं असं लाईफ हवे का तुम्हांला ? हे शक्य करण्यासाठी स्वतःला ओळखणे (सेल्फ अवेअरनेस ) अतिशय महत्वाचे आहे . सेल्फ कोचिंग टेक्निकचा वापर करून स्वतःला कसे ओळखायचे हे मी तुम्हांला माझ्या ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे, तर माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा .
मी किर्ती मिलिंद सहानी, तुमची सेल्फ कोचिंग कोच. येत्या तीन वर्षात कमीत कमी 10,000 लोकांना सेल्फ कोचिंग टेक्निक शिकवून त्यांचं लाईफ अधिक आनंदी, समाधानी, संतुलित आणि अधिक प्रोड्युक्टिव्ह बनविण्याचा माझा ध्यास आहे.
तुमच्या लाईफ मध्ये अनेकदा गोष्टी, घटना जेव्हा तुमच्या मनाप्रमाणे घडत नाहीत त्यावेळी हळू हळू त्याचा तुमच्या मनावर ताण पडायला लागतो. त्याचा तुमच्या विचारसरणीवर, तुमच्या भावविश्वावर, तुमच्या नात्यांवर, तुमच्या कामावर, तुमच्या संवाद शैलीवर, विपरीत परिणाम व्हायला सुरुवात होते. लाईफ वरचा तुमचा कंट्रोलच सुटल्यासारखं तुम्हांला वाटायला लागतं. तुम्ही हतबल आणि नाराज व्हायला लागता. हे सगळं टाळण्यासाठी सेल्फ कोचिंग टेक्निकचा वापर करणं अतिशय गरजेचे आहे. सेल्फ कोचिंग टेक्निकची सगळ्यात प्राथमिक स्टेप म्हणजे स्वतःला ओळखणे (सेल्फ अवेअरनेस). स्वतःला ओळखताना तुम्हांला तुमच्या लाईफचा खरा अर्थ, तुमच्या अस्तित्वाचा खरा हेतू समजतो. तुम्हाला तुमच्या आवडी, तुमची स्वप्न नव्याने उमगतात. तुम्हांला ती पूर्ण करण्याची गरज जाणवते.
सेल्फ कोचिंग टेक्निक तुमच्या खऱ्याखुऱ्या भावना, गरजा, कमतरता, इच्छा-आकांक्षा, आवडी-निवडी या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हांला जागरूक बनवते. जेवढं जास्त तुम्ही स्पष्टपणे स्वतःला ओळखायला लागाल तेवढा अधिक आत्मविश्वास तुमच्यात निर्माण होईल आणि तुम्ही अधिक सर्जनशील (क्रिएटिव) बनाल.तुमचं संभाषण कौशल्य (कम्युनिकेशन स्किल) सुधारेल, तुमची नाती अधिक घट्ट होतील आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगती कराल म्हणूनच तुम्हाला स्वतःच्या लाईफ मध्ये काही बदलायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला स्वतःबद्दल जागरूक (अवेर) असणे खूप गरजेचे आहे.
चला तर बघुया सेल्फ कोचिंग टेक्निक वापरून स्वतःला ओळखण्यासाठी स्वतःलाच विचारण्याचे 9 अतिशय सोपे पण खूप प्रभावी प्रश्न.
1.मला माझ्यातलं सगळ्यात जास्त काय बरं आवडतं?
या गोष्टीचा विचार जेव्हा तुम्ही करायला लागाल तेव्हा तुम्हांला स्वतःला समजणं , स्वतःला स्वीकारणं अधिक सोप्प होईल. तुम्हांला स्वतःमध्ये जे आवडतं त्याची लिस्ट बनवून तुम्ही स्वतःबद्दलच्या गोष्टी जशा आहेत तशा स्वीकारायला लागाल. अशावेळी तुम्हांला एका वेगळ्याच आत्मीय शांतीचा अनुभव होईल.
2. माझ्या आयुष्यातल्या कुठल्या एरियामध्ये मला बदल हवा आहे?
जेव्हा ह्या गोष्टींचा तुम्ही विचार कराल तेव्हा तुमच्या इच्छा आणि स्वप्नाबरोबरच तुमच्या स्वतःमधल्या काही कमतरतांमध्ये बदल घडविण्याचा पण विचार करा. तुमच्यातल्या कमतरता सुधारल्या तर आपोआपच तुमच्या लाईफ मध्ये चांगले बदल घडायला सुरुवात होईल
3. मला कोणत्या गोष्टींची भीती वाटते?
तुम्ही कशाला घाबरता, अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हांला लाईफमध्ये पुढे जाऊ देत नाही आहेत, ह्या गोष्टींचा विचार करा जेव्हा तुम्हाला तुमच्या असुरक्षिततेच्या भावनां बद्दल तुम्हाला जाणीव होईल तेव्हा त्या भितींवर मात करून तुम्ही तुमच्या लाईफमधला एक महत्त्वाचा टप्पा गाठू शकता
4. मला लाईफमधल्या कुठल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता वाटते?
तुमच्या लाईफमध्ये कृतज्ञता अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या मनात जेव्हा कृतज्ञतेचे भाव निर्माण होतात तेव्हा तुम्हांला लाईफमधल्या बऱ्याचश्या गोष्टी आवडायला लागतात. तुम्हांला आजूबाजूच्या माणसांमध्ये, परिस्थितींमध्ये नेहमीच काहीतरी चांगलं दिसायला लागतं. कृतज्ञतेमुळे तुम्हांला तुमच्या लाईफमध्ये ज्यांचा सपोर्ट मिळाला त्यांच्याबद्दल तुम्हांला कौतुक वाटायला लागतं आणि तुम्ही लोकांच्या अधिक जवळ जाता.
5. मी लाइफमध्ये जे करतोय किंवा करतेय त्याने मला आनंद मिळतो आहे का?
लाईफमध्ये हा प्रश्न तुम्ही स्वतःला अधून मधून विचारायलाच हवा. जे तुम्ही करत आहात ते खरंच करायचं आहे का तुम्हांला? तुम्हांला ते करताना आनंद होतोय का ? मजा वाटते आहे का ? की तुम्ही असं काहीतरी करताय जे दुसऱ्याने तुमच्यावरती लादलंय? जर तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हांला हे सांगत असतील की तुम्हांला त्यात आनंद मिळत नाही आहे तर ते बदलण्यासाठी तुम्ही काय कारलं हे तुम्हांला स्वतःला विचारायला हवं.
6. मला माझ्या लाईफने सगळ्यात महत्त्वाच्या कुठल्या गोष्टी शिकवल्या?
आतापर्यंतच्या तुमच्या लाईफमध्ये कुठल्या अशा महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही शिकलात ज्यांनी तुम्हांला तुमचं लाइफ बदललं असं वाटतंय? कुठल्या अशा गोष्टी होत्या ज्यांच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये चांगले-वाईट असे दोन्ही प्रकारचे बदल घडले? लाईफमधल्या कुठल्या अशा अनुभवांमुळे तुमच्यामध्ये बदल झाले? ही उत्तरे तुम्हांला तुमच्या लाईफ मधल्या सगळ्यात महत्त्वाच्या घटनांची आठवण करून देतील. कुठल्या गोष्टी तुमच्यावर प्रभाव पाडतात याची तुम्हाला जाणीव करून देतील.
7. माझ्या लाईफमध्ये मला सगळ्यात जास्त प्रेरणा कुणाकडून मिळते? त्यांच्यातल्या कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या मला प्रेरित करतात?
या उत्तरांमुळे तुम्ही लाईफ मध्ये दुसऱ्यांच्या प्रभावाखाली नक्की कुठल्या दिशेने जाताय याची जाणीव तुम्हांला होईल. जर तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या, ध्येयाच्या दिशेने जात नसाल तर तुम्हांला स्वतः मध्ये काय बदल करावे लागतील हे तुम्हांला उमगेल.
8. माझ्यासाठी पैसे किती महत्त्वाचे आहेत?
हे अतिशय महत्त्वाचं उत्तर आहे. ह्याने तुम्हांला तुमच्या आयुष्याच्या प्रायॉरिटीज (प्राधान्य ) समजतील. तुमची ध्येयं काय आहेत हे ह्या उत्तराने पक्कं होईल . तुम्ही तुमच्या लाइफचा वेळ आणि तुमचे प्रयत्न नक्की कशासाठी वापरत आहात आणि हेच तुम्हांला साध्य करायचं आहे का हे तुम्हांला स्पष्ट होईल. तुम्हांला कुठल्या प्रकारचं लाईफ जगायचय हेही तुम्हांला समजेल . तुमच्या लाईफमध्ये पैशाला जर प्राधान्य नसेल तर स्वतःला प्रश्न विचारा की नक्की कुठल्या गोष्टीला प्राधान्य आहे तुमच्या आयुष्यात?
9. कुठे असेन मी लाइफ मध्ये 5, 10 आणि वीस वर्षानंतर?
तुम्ही जेव्हा स्वतःला या प्रश्नाचे उत्तर द्याल तेव्हा तुमच्या आयुष्यातली ध्येयं स्पष्ट होतील. तुमच्या लाईफमधल्या सगळ्या जबाबदाऱ्या, तुमची सगळी कर्तव्य लक्षात ठेवून तुम्ही स्वतःच्या क्षमतेनुसार तुमच्या ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करू शकाल .
वरील 9 प्रश्नांची उत्तरे तुमची स्वतःशी ओळख करून देण्यात तुमचं योग्य मार्गदर्शन करतील. तुमच्या आवडी-निवडी, तुमची ध्येयं, तुमची विचार करण्याची पद्धत, गोष्टींकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन, तुमची संवाद साधण्याची कला, तुमचे मूड, तुमच्यातल्या कमतरता, परिस्थितींना तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया या सगळ्यांची तुम्हाला जाणीव होईल. अशाप्रकारे तुमच्या आयुष्यात तुम्हांला कोण आणि काय सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, तुम्ही कुठल्या गोष्टीला किती प्राधान्य दिले पाहिजे या गोष्टी ओळखून लाईफचा कंट्रोल तुम्हांला तुमच्या हातात घेता येईल. तुम्हांला तुमचं लाईफ अधिक आनंदी, समाधानी,संतुलित आणि अधिक प्रॉडक्टिव्ह जगता येईल.
माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार! हा ब्लॉग तुम्हांला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा . सेल्फ कोचिंग टेक्निकबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या माझ्या एफबी पेजच्या लिंक वर क्लिक करा आणि माझ्या पुढील ब्लॉगची वाट पहा .
www.facebook.com/KirtiSelfCoach/
धन्यवाद!










Mast Kirti tai, Chan point ahet
उत्तर द्याहटवामस्तच.
उत्तर द्याहटवाखूपच छान ब्लॉग कीर्ती ताई
उत्तर द्याहटवाKhupach chan 👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवा