लाईफमधल्या बदलांचं आनंदाने स्वागत करायचं असेल तर वापरायचे 5 टेस्टेड मार्ग
खरं सांगा, तुमच्या बरोबर असं होतं का कधी की लाईफमध्ये काहीतरी चांगलं घडणार असतं, तुम्हांला काहीतरी चांगलं मिळणार असतं तरीदेखील तुमच्या मनावर एक प्रकारच दडपण येतं, टेन्शन येतं, काळजीत असता तुम्ही? बऱ्याचदा होतं ना! लाईफमध्ये खूप वेळा असे प्रसंग येतात ज्यामध्ये काहीतरी चांगलं घडत असतं किंवा घडणार असतं, त्यामुळे तुमची प्रगती होणार असते, तुम्हांला फायदा होणार असतो, तुम्हांला आनंद मिळणार असतो पण ह्यामुळे कसं कुणास ठाऊक तुमचं मन एका अनामिक भितीने भरून जातं. कसं बरं हाताळाल लाईफमधल्या अशा बदलांना सेल्फ कोचिंग टेक्निकचा वापर करुन, हेच मी तुम्हांला माझ्या आजच्या या ब्लॉग मध्ये सांगणार आहे तर माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.
मी किर्ती मिलिंद सहानी, तुमची सेल्फ कोचिंग कोच. येत्या तीन वर्षात कमीत कमी दहा हजार व्यक्तींना सेल्फ कोचींग टेक्निक शिकवून त्यांचं लाईफ अधिक आनंदी, संतुलित ,समाधानी आणि अधिक प्रॉडक्टिव बनवण्याचा माझा ध्यास आहे.
तुमच्या लाईफमधला बदल चांगला असो वा वाईट तुम्हांला एका अनोळखी, अनपेक्षित परिस्थितीला सामोरे जावे लागते. एका नव्या पद्धतीने तुम्हाला वागावं लागत. नव्या गोष्टी स्वीकारायला तुम्हाला अवघड जात.
खरं तर बदल हा तुमच्या-माझ्या आपल्या सगळ्यांच्याच लाईफमधला अविभाज्य, अटळ घटक आहे. तरीही तुम्ही ,मी आपण सगळेच कुठल्याही नवीन बदलाला सामोरे जाताना आपल्या मनात अगणित प्रश्न निर्माण होतात. अगदी तुमच्या लाईफमध्ये प्रगती करणारा बदल असला तरीही, लाईफमध्ये तुम्हांलाआनंद मिळणार असला तरीही तुम्ही प्रथम दर्शनी त्याचा प्रतिकारच करता. एक शंका डोकावते तुमच्या मनात. तुम्हांला लाईफमध्ये एक प्रकारची शाश्वती लागते, एक प्रकारचा comfort लागतो. तुम्हांला नेहमीच असं वाटत राहतं की जे घडणार आहे, जे होणार आहे माझ्याबरोबर ते मला माहिती असावं. अनोळखी गोष्टी तुमच्या लाईफ मध्ये जेव्हा येतात तेव्हा तुम्हांला त्यांच्याबद्दल एक प्रकारची भीती,अस्वस्थता वाटते.
तुम्हांला माहित आहे का मला पण अशीच अस्वस्थता, असुरक्षितता जाणवायची माझ्या लाईफमध्ये. शाळा संपवून कॉलेजला जाताना, कॉलेज संपवून नोकरीला जाताना, माझ्या लग्नाची तारीख जवळ आलेली असताना, छोट्या घरातून मोठ्या नवीन घरात जाताना अशा कितीतरी प्रसंगांमध्ये मलादेखील ताण तणाव अनुभवायला मिळायचा. अशावेळी समजायचं नाही हसावं की रडावं!
जे पाच मार्ग वापरून मी माझ्या लाईफमधले बदल सहज स्वीकारायला शिकले तेच पाच मार्ग वापरून तुम्ही देखील तुमच्या लाईफमध्ये अधिक परिवर्तनशील बनू शकता. तुमच्या लाईफमधल्या प्रसंगांना सहजपणे सामोरे जाऊ शकता. लाईफ मधली अवघड वळणं आणि मोठे बदल यांचं मनापासून स्वागत करू शकता.
1. मल्टिपल ध्येय ठरवा.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुम्हांला सगळ्यात जास्त ताण हा तुम्हांला जे हवं असतं ते साध्य करण्याच्या प्रयत्नांमुळे होतो. तुमच्या लाईफमध्ये बऱ्याचदा तुम्ही एखाद्या मोठ्या ध्येयाच्या मागे लागता. तुमचं ते मोठं ध्येय साध्य करण्यात इतके गुंतून जाता की ध्येय साध्य झाल्यावर पुढे काय करायचं तेच तुम्हांला समजत नाही. मोठं ध्येय साध्य करण्यात तुम्ही तुमची सगळी शक्ती वापरता आणि ध्येय साध्य केल्यावर, आपल्याला जे हवं होतं ते मिळवल्यावर त्याचं नक्की काय करायचं हेच प्लॅन करायला तुम्ही विसरता. खरं तर तुम्ही लाईफमध्ये एक ध्येय साध्य केल्यावर दुसऱ्या ध्येयाकडे वळलं पाहिजे. पण जर दोन्हींमधलं अंतर मोठं असेल तर मग तुम्हांला लाईफ एकदम रीत वाटायला लागतं,तुम्ही तुमचा मोमेंटम घालवून बसता. हे टाळण्यासाठी तुम्हांला अनेक छोटी ध्येय ठरवली पाहिजेत. म्हणजे तुमचं एक ध्येय साध्य झाल्यावर तुमच्याकडे दुसर लगेच तयार असेल. तुमचं ध्येय जास्त मोठं नसल्यामुळे ते साध्य करताना तुमची दमछाक होणार नाही आणि तुम्ही लगेच पुढच्या ध्येयाकडे वळू शकाल. तुमच्या लाईफला एक नियमित चालना मिळत राहील. छोट्या छोट्या ध्येयांमुळे होणारे छोटे छोटे बदल तुम्ही सहज पद्धतीने स्वीकारू शकाल.
2. तुमच्या सहनशक्तीची मार्यादा ओळखा.
3. गायडन्स आणि सपोर्ट मिळवा.
माझ्या ओळखीची बरीचशी माणसे त्यांच्या लाईफमधल्या बदलांना हाताळताना माझ्याकडून सपोर्ट घेत असतात.
समाजात विशिष्ट प्रश्नांवर काम करणारे बरेचसे सपोर्ट ग्रुप्ससुद्धा असतात.त्यांची पण तुम्ही मदत घेऊ शकता. तिथे तुम्हाला तुमच्यासारखे समविचारी लोक भेटण्याची ही शक्यता असते.
4. तुम्ही मनोरंजनासाठी काय बघता?
तुमच्या लाईफमध्ये एखादा मोठा बदल होत असतो आणि तुम्ही अस्वस्थ असता, चिंतेत असता अशावेळी तुम्ही टीव्हीवर, सोशल मीडियावर नक्की काय बघता हे खूप महत्त्वाचे आहे.
तुम्हाला एरवी आवडणाऱ्या कौटुंबिक मालिका किंवा क्राईम सिरीज बघणं टाळून अशावेळी काहीतरी हलकंफुलकं विनोदी बघितलं तर तुमचा ताण कमी व्हायला मदत होईल. तुमचं खळखळून हसणं नुसता तुमचा तणाव कमी करत नाही तर त्याच बरोबर तुमचे ब्रीदिंग सुधारते, तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढवते, तुमचे स्नायू रिलॅक्स करते, तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि तुमची दुखणी देखील घालवते.
तुम्ही लाईफमध्ये एखाद्या बदलाला तोंड देत असताना सोशल मीडियाचा वापर कमी करून टाकणं नक्कीच फायदेशीर असतं. दुसऱ्यांच्या सेल्फीज, त्यांचे फिरायला गेलेल्याचे आनंदाचे पिक्चर बघून कळत नकळत मनात कुठेतरी त्यांच्याशी तुलना करणं आणि त्यातून दुःखी होणं टाळण्यासाठी हे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या स्वतःच्या लाईफमधल्या बदलांमुळे आलेले ताणतणाव खूप असतात तुमच्यासाठी हाताळायला.
5. स्वतःची काळजी घ्या.
तुम्ही जर वेळेवर जेवण, नियमित व्यायाम, पौष्टिक आहार, पुरेशी झोप आणि कामांमध्ये छोटे-छोटे ब्रेक या पद्धतीने स्वतःची काळजी घेतलीत तर लाईफमध्ये येणाऱ्या मोठ्या बदलांना प्रभावी पद्धतीने हाताळायला तुम्ही मानसिक,शारीरिक आणि भावनिकरित्या सुसज्ज असाल. बदल सहजपणे स्वीकारण्याकरिता ताण तणावांना तुम्ही जी प्रतिक्रिया देत असता तिच्यात बदल आणणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हांला रोजच्या रोज तुमच्या मनःशांतीसाठी ध्यान (मेडिटेशन) केलं पाहिजे. तुम्ही तुमचं मन बदल न होण्याच्या काळात जेवढं शांत ठेवायला शिकाल तेवढंच तुम्ही बदल होण्याच्या काळात त्या बदलांना तुमच्या लाईफमध्ये अधिक सहजतेने स्वीकाराल.
माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनःपूर्वक आभार. माझा ब्लॉग तुम्हांला आवडला असल्यास कृपया लाईक शेअर कमेंट करा. सेल्फ कोचिंग टेक्निकबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या एफबी पेज लिंकवर क्लिक करा आणि आणि माझ्या पुढच्या ब्लॉगची वाट पहा.
www.facebook.com/KirtiSelfCoach/
धन्यवाद!
खूप छान सोल्युशन्स दिली आहेत कीर्ती . खरंच असा त्रास होतो .
उत्तर द्याहटवाThank you so much Asmita
हटवाInspirational information. .. Thank you
उत्तर द्याहटवाThank you Swati
हटवाPowerful 👍
उत्तर द्याहटवाThank you😊
हटवाGreat tecnic, powerful Kirti tai
उत्तर द्याहटवाThank you Harshali
हटवाजीवनातील बदल स्वीकारण्याचे पाच मार्ग अतिशय सुंदर रीतीने सांगितले आहे.
उत्तर द्याहटवाThank you Sunita Ma'am
हटवाखूप सुंदर शब्दात मार्गदर्शन केलं madam तुम्ही
उत्तर द्याहटवाThank you 😊
हटवाखूपच सुंदर ब्लॉग धन्यवाद मॅडम
उत्तर द्याहटवाThank you Dipti
हटवाखूप सुंदर कीर्ती. मस्तच लिहिलं आहेस
उत्तर द्याहटवाThank you so much Swati
हटवाKhup chan
उत्तर द्याहटवाधन्यवाद 😊
हटवाखुप छान मार्गदर्शन thank you 🙏🙏👍
उत्तर द्याहटवाThank you Sunita Ma'am
हटवावा, खरंच किती छान लिहिलं आहेस
उत्तर द्याहटवामस्त
Keep it up👍
Thank you so much UC
हटवाPowerful 🌹🌹
उत्तर द्याहटवामस्तच ...!
उत्तर द्याहटवाअगदी मनातला विचार मांडला आहे कीर्ती मॅडम खूप मस्तच....
उत्तर द्याहटवा