4 महत्त्वाचे घटक जे वाढवतात तुमची आंतरिक प्रेरणा
तुम्हाला आठवतं का शेवटचं कधी तुम्हांला एखादी गोष्ट खूप वाईट रीतीने (desperately) हवी होती? त्या गोष्टीची इच्छा होण्याच्या मागे कोणते कारण होते? आणि जर तुम्ही अखेरीस ते साध्य केले असेल तर त्या मागील तुमची प्रेरणा काय होती? जेव्हा तुम्हांला पाहिजे असलेल्या एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करण्याची वेळ येते, मग ती तुमची स्वप्नातली नोकरी असो, कार असो, घर असो किंवा जोडीदार असो, तेव्हा अशा अनेक शक्ती असतात ज्या तुम्हांला तुमच्या इच्छेकडे आकर्षित करतात. तुमच्या भूतकाळात डोकावून पहा आणि तुम्ही नुकत्याच प्राप्त केलेल्या एखाद्या गोष्टीचा मागोवा घेत असताना ते मिळण्यासाठी तुम्ही कुठल्या अनुभवांमधून गेलात किंवा ते मिळण्यासाठी कुणी तुम्हांला प्रवृत्त केले, हे विचारून बघा स्वतःला. तुमच्या इच्छेमागे कोणती शक्ती असते?कसं बरं मिळतं प्रोत्साहन तुम्हांला एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी? हेच सांगणार आहे मी माझ्या ह्या ब्लॉगमध्ये. तर माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा. मी कीर्ती मिलिंद सहानी तुमची सेल्फ कोचिंग कोच. येत्या तीन वर्षात कमीत कमी दहा हजार व्यक्तींना सेल्फ कोचिंग टेक्निक्स शिकवून त्यांचं लाईफ अधिक ...