तुमचे 7 व्यक्तीगत गुण जे ठरवतात तुम्ही कोचेबल आहात कि नाही !


 आपण स्वतःच्या परफॉर्मन्सबद्दल किती जाणकार लोकांचे अभिप्राय विचारता? तुम्ही त्यांच्या अभिप्रायांना कसा प्रतिसाद देत? तुम्ही स्वतःशी आणि आजूबाजूच्या लोकांशी किती प्रामाणिक असता ? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुमची मानसिकता दर्शवते. 

 कॅरोल डवेक यांच्या मते तुमचे विचार तुमचा माईंड- सेट म्हणजेच तुमची मानसिकता ठरवते. तुमची मानसिकताच हे ठरवते कि तुम्ही कोचेबल आहात कि नाही ? 

त्यांच्या म्हणण्यानुसार ग्रोथ माइंड-सेट असलेल्या व्यक्ती त्यांच्यातले कलागुण, त्यांचे छंद, त्यांचा स्वभाव या गोष्टींमध्ये स्वतःच्या प्रयत्नांनी आणि त्यांच्या परिस्थिती हाताळण्याच्या पद्धतींनी प्रगती करू शकतात. ग्रोथ माइंड-सेट विचारसरणीचा वापर करून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास त्यांच्या प्रयत्नांनी जोपासू शकतात. यामुळेच एक ग्रोथ माईंड-सेट असलेली व्यक्ती नक्कीच कोचेबल असते.

  तुम्ही कोचेबल असता म्हणजे तुम्ही विचारणा करण्यासाठी आणि मिळालेला अभिप्राय स्वीकारण्यासाठी खुले असता. तुम्ही स्वतःच्या आत डोकावून स्वतःच्या प्रगतीचे रस्ते शोधून काढता. कोचेबल माणसं गोष्टी वैयक्तिक रित्या किंवा टीका म्हणून घेत नाहीत त्याऐवजी त्यांना संधी म्हणून पाहतात. कोचेबल व्यक्ती प्रयत्न करून पाहतात आणि त्यांचं जे ध्येय ठरवलेलं असतं ते साध्य करण्यासाठी स्वतःच्या कार्यक्षमतेचे परीक्षण करतात आणि त्यासाठी दुसऱ्यांच्या अभिप्रायाचा उपयोग करतात. याचा अर्थ असा नाही की इतरांनी त्यांच्याबरोबर सामायिक  (शेअर) केलेली प्रत्येक गोष्ट सत्य म्हणून त्यांना स्वीकारावी लागते, तर याचा अर्थ एवढाच आहे की दुसऱ्यांंनी सांगितलेली गोष्ट स्वतःच्या गरजा पूर्ण करूू शकते का हेे ते बघतात.

कोचेबल असणे एक अखंड प्रक्रिया आहे. बर्‍याचदा तुम्ही एखाद्या विशिष्ट प्रकारच्या परिस्थितीत कोचेबल नसता. कधीकधी विशिष्ट प्रकारच्या गोष्टींमध्ये तुम्ही कोचेबल नसता तर कधी कधी काही विशिष्ट माणसांबरोबर तुम्ही कोचेबल नसता. 

असं काय असतं जे तुम्हाला कोचेबल बनवतं? हेच सांगणार आहे मी तुम्हांला माझ्या या ब्लॉग मध्ये. तर माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.

मी किर्ती मिलिंद सहानी तुमची सेल्फ कोचिंग कोच. येत्या तीन वर्षात दहा हजार व्यक्तींना सेल्फ कोचिंग टेक्निक्स शिकवून त्यांचं लाईफ अधिक आनंदी, समाधानी , संतुलित आणि अधिक प्रोड्युक्टिव्ह बनवण्याचा माझा ध्यास आहे. 

 खरंच कोचिंगने तुमची वैयक्तिक आणि व्यावसायिक यश मिळवण्याची शक्यता वाढते. चला तर पाहूया कोचेबल असण्यासाठी तुम्हांला कुठल्या गुणांची गरज भासते. 

1. अभिप्राय विचारून नवीन काहीतरी शिकायला सदैव तयार रहाणे: 


तुमच्या माहितीतल्या जाणकार यशस्वी आणि प्रभावी व्यक्तींना विचारून बघा की तुम्हांला एखादं ध्येय साध्य करायचं असेल,एखादी नवीन जबाबदारी स्वीकारायची असेल, एखादी नवीन कला शिकायची असेल तर तुम्हांला स्वतःमध्ये कुठले बदल केले पाहिजेत? तुमच्या सामर्थ्याचे कुठल्या नवीन पद्धतीने मूल्यमापन करायला हवे किंवा तुम्हांला कसं दुसऱ्या पद्धतीने स्वतःचा विकास केला पाहिजे हे त्यांच्याकडून जरूर जाणून घ्या. 

तुमची स्वतः मधली कमतरता, तुमचे स्वतः मधले दोष जाणून घ्यायची जी उत्सुकता तुम्हांला असते ती अतिशय निरोगी असते. स्वतःच्या प्रगतीसाठी स्वतःला प्रेरणा देणारे आणि स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी सदैव तयार असणारे नेहमीच कोचेबल असतात.

2. अभिप्राय निश्‍चतपणे समजून घेणे:


    तुम्हांला मिळालेल्या अभिप्रायाचं महत्त्व आणि गांभीर्य समजणे अतिशय गरजेचे असते. कधी कधी एखादा अभिप्राय एखाद्या अनौपचारिक सूचनेच्या रूपातही मिळू शकतो. कधी एखादा अभिप्राय तुमची व्यावसायिक दिशा बदलणारा देखील असू शकतो. तुम्हांला नक्की काय समजलं ते निश्चित करून घ्या. तुम्हांला मिळालेल्या अभिप्रायाच्या अचूक अर्थाबद्दल तुम्ही अनिश्चित असल्यास त्यातील संदेश स्पष्ट करणारी उदाहरणे शोधा. अभिप्रायाचा अर्थ समजल्याची खात्री करून घेणारे निश्चितच कोचेबल असतात.

3. अभिप्राय देणाऱ्याचे आभार मानणे:


तुम्हांला मिळालेल्या अभिप्रायाला तुम्ही दिलेला प्रतिसादच ठरवतो की तो तुम्हांला मिळणाऱ्या अनेक सल्ल्यांपैकी एक उपयुक्त माहिती आहे की तुम्हाला मिळालेला शेवटचा अभिप्राय आहे. अभिप्राय मिळाल्याबद्दल कृतकृत्य असाल तर तुम्ही निश्चितच यशस्वीरीत्या कोचेबल बनू शकता.म्हणूनच नेहमी अभिप्राय देणाऱ्याचे आभार जरूर माना.

4. सुधारणा कशी करावी यासंबंधी जरूर विचारणा करणे:


तुम्हांला अभिप्राय देणाऱ्यास तुमची कामाची पद्धत सुधारण्यासाठी त्यांच्या युक्ती विचारून घेणं हे कोचेबल व्यक्तीचा मुलभूत गुण आहे. तुमच्या ध्येय साध्य करण्याच्या पद्धतीत बदल घडवण्याबद्दल किंवा काहीतरी नवीन प्रारंभ करण्याबद्दल काही उपयोगी कल्पना असतील तर त्याबद्दल सूचना करण्यास आवर्जून विनंती करा. अशा कल्पना एखाद्या व्यक्तीस अधिक प्रभावी बनण्यास निश्चित मदत करतात. कोचेबल व्यक्ती ह्यातून नक्की फायदा उठवतात. 

5. कठोर किंवा अनपेक्षित अभिप्रायांचे स्वागत करणे:


तुम्हांला मिळालेले अभिप्राय हे वैयक्तिक तुमच्या स्वतःबद्दल नसून तुमच्या वागणुकीला, तुमच्या कामाला मिळालेली दाद आहे हे कोचेबल नेहमीच समजून घेतात. त्या अभिप्रायांमुळे दुःखी न होता त्यांना शिक्षणाची संधी म्हणून स्वीकारतात. बऱ्यावाईट अशा सर्व प्रकारच्या अभिप्रायांचे स्वागत करण्याची स्वतःला आयुष्यभर सवय लावतात.

6. जबाबदारीची जाणीव असणे :


जबाबदारी ही अशी गोष्ट आहे की जी दुसऱ्याने तुम्हांला देऊन चालत नाही, तर ती स्वतःच्या आतून यावी लागते. स्वतःला जबाबदार वाटणं ज्याची त्याची वैयक्तिक निवड असते. या अशा कोचेबल व्यक्ती मर्यादांची कारणे न सांगता स्वतःबद्दलच्या अपेक्षा पूर्ण करतात. स्वतःच्या चुका मोकळेपणाने स्वीकारतात. भावनांच्या भरात वाहून न जाता स्वतःच्या ध्येयपूर्तीसाठी सतत प्रयत्न करतात.

7. दीर्घ मुदतीचा विचार करणे: 


जे कोचेबल असतात त्यांना स्वतःची ध्येय असतात. त्या ध्येयांना साध्य करण्याचा एक विशेष काळ त्यांनी निश्चित केलेला असतो. या दोन गोष्टींशिवाय स्वतःला कशाबद्दल कोचिंग करणार तुम्ही? म्हणूनच कोचेबल व्यक्ती स्वतःच्या ध्येयाबद्दल दूरदृष्टिकोनातून विचार करतात, त्यासाठी कार्यरत राहतात. कोचेबल व्यक्तींची स्वतःच्या लाईफबद्दलची अशी योजना त्यांच्या सेल्फ कोचिंगमधून(स्वप्रशिक्षण) यशस्वी होते. 

शेवटी अशी एखादी सेल्फ कोचिंगसाठी(स्वप्रशिक्षण) तयार असलेली व्यक्ती निश्चितच आधी स्वतः बरोबर वेळ घालवून स्वतःच्या काय इच्छा आहेत, काय स्वप्नं आहेत, त्यावर काय कृती करायची ह्याबद्दल जागरूकता ठेवूनच सेल्फ कोचिंगला सुरुवात करते. त्यांच्या या कृतीमुळे त्यांची झालेली प्रगती ही त्यांच्या प्रगतीची जबाबदारी घेतलेल्या भागीदाराबरोबर (अकाउंटेबिलिटी पार्टनर) शेअर करते. यातून त्यांची सेल्फ कोचिंगची प्रक्रिया पूर्णत्वाला जाते. 

माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनःपूर्वक आभार. माझा हा ब्लॉग तुम्हांला आवडला असल्यास नक्की लाइक, शेअर आणि कमेंट करा. खाली दिलेल्या FB page आणि FB group च्या लिंक वर क्लिक करा आणि सेल्फ कोचिंगच्या प्रवासात मला जॉईन करा.

 एफबी पृष्ठwww.facebook.com/KirtiSelfCoach/

एफबी गटhttps://www.facebook.com/groups/823092068235568/?ref=share 

 

तुम्हांलादेखील मनाच्या एखाद्या कोपऱ्यात असं जाणवत असेल की तुमच्या जीवनातल्या सर्व अंगांची उत्तरे तुमच्याकडे नाहीत , तुमच्या आयुष्यातल्या वैयक्तिक, आणि व्यावसायिक प्रगतीच्या प्रवासात तुम्हांला सेल्फ कोचिंग टेक्निक्स वापरायचे असतील, आणि ते वापरण्यासाठी तुम्ही कोचेबल आहात की नाही हे जाणून घ्यायचं असेल तर मी घेत असलेल्या  Counselling च्या मोफत 1-2- 1 सेशनचा  फायदा उठवण्यासाठी माझ्या ई मेल id वर संपर्क साधा. 

selfcoachkirti@gmail.com


धन्यवाद! 




टिप्पण्या

  1. All the points are very good but very difficult to implement, so we have to take help from self coach like you.

    उत्तर द्याहटवा
  2. Kirti very nice blog.
    Need your help for implementation. I am interested in one to one with you.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

4 महत्त्वाचे घटक जे वाढवतात तुमची आंतरिक प्रेरणा