सेल्फ कोचिंगची 10 यशस्वी धोरणे जी बनवतात तुम्हांला पीक परफॉर्मर (भाग 2)
तुम्ही कौतुकाने कुणाकडे बघता? कोणत्या व्यक्तिंची कामगिरी, प्रगती साधण्याची क्षमता आणि निर्भयता तुमच्यासाठी पूर्णपणे प्रेरणादायक असते?
दररोज हजारो व्यक्ती अडथळे दूर करतात आणि भूतकाळाच्या सीमांना धक्के देत स्वतःची उन्नती करतात. त्यांची सर्वात सुंदर स्वप्ने जगतात. माझ्या आयुष्यातील बऱ्याच लोकांकडून मला नेहमीच स्फूर्ती मिळाली आहे. ज्यांना स्वतःहून आवश्यक ते परिणाम मिळवण्याची आणि त्या प्रक्रियेत त्यांच्या आवडीचे अनुसरण (फॉलो पॅशन) करण्याची वैयक्तिक शक्ती आहे. मग तो माझा शेजारी असो, एखादा ॲथलिट असो वा एखादा व्यावसायिक असो, या व्यक्तींचे दृष्टिकोन, वर्तने आणि कल्पनांचे परीक्षण करून मला स्वतःच्या सर्वोच्च कामगिरीची चौकट निर्माण करायला मदत होते.
थोर मानसशास्त्रज्ञ विल्यम जेम्स यांचा असा विश्वास आहे की लोकं त्यांच्या संभाव्यतेपैकी केवळ 10 ℅ वापरतात इतर 90 ℅ हे स्वप्नाळू आणि कृतिशील लोकांना वेगळे करतात. लोकं त्यांच्या विश्वासापेक्षा जास्त सक्षम असतात किंवा त्यासाठी प्रयत्न करायला तयार असतात, म्हणूनच तुम्ही देखील पीक परफॉर्मर बनू शकता.
पीक परफॉर्मरप्रमाणे विचार आणि कार्य करण्यासाठी माझ्या मागील ब्लॉकमध्ये सांगितलेल्या सेल्फ कोचिंगच्या पाच यशस्वी धोरणांचा तुम्हांला निश्चितच फायदा होईल. पुढील पाच यशस्वी धोरणे मी तुम्हांला माझ्या आजच्या ब्लॉगमधून सांगणार आहे. तर माझा आजचा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.
मी किर्ती मिलिंद सहानी तुमची सेल्फ कोचिंग कोच. येत्या तीन वर्षात कमीत कमी दहा हजार व्यक्तींना सेल्फ कोचिंग टेक्निक्स शिकवून त्यांचं लाईफ अधिक आनंदी,समाधानी ,संतुलित आणि अधिक प्रोडक्टीव्ह बनविण्याचा माझा ध्यास आहे.
तुमचं एक विशिष्ठ लक्ष्य निश्चित करणे, तुमचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवणे आणि योग्य ती कृती करून इच्छित परिणाम प्राप्त करणे या सर्व गोष्टी पीक परफॉर्मन्ससाठी (सर्वोच्च कामगिरीसाठी ) महत्वाच्या आहेत. या सर्व गोष्टी सेल्फ कोचिंगने शक्य होतात. चला तर पाहूया स्वतःला पीक परफॉर्मर बनवण्यासाठी उपयुक्त अशी उर्वरित 5 यशस्वी धोरणे.
1. आत्मजागरूकता उच्च पातळीवर न्या:
आत्मजागरुकता ही स्वतःमध्ये काय असावे याबद्दल नसून स्वतः काय आहोत याबद्दल आहे. स्वतःकडे लक्ष देणे, स्वतःबद्दल निरीक्षण करणे, स्वतःची ओळख करून घेणे ह्या सर्व गोष्टी सेल्फ कोचिंगमध्ये अतिशय महत्त्वाच्या असतात. स्व-प्रशिक्षकाला (सेल्फ कोचला) जागरूक असणे खूप गरजेचे असते. मग ते स्वतःच्या वर्तमानाबद्दल असो वा भूतकाळाबद्दल. स्वतःची शक्ती , कौशल्ये ,मूल्ये,आवडी समजून घेणे हे आत्म-जागरुकतेेेची पातळी वाढवण्यासाठी उपयुक्त होते . उच्च आत्म-जागरुकतेतून आत्मविश्वासाची गती वाढते .
2. आपला वैयक्तिक अनुभव deconstruct ( विनिमय ) करा:
पीक परफॉर्मर त्यांच्या स्वतःबद्दलच्या जाणिवांना वापरून त्यांच्या स्वतःच्या अनुभवांचे विश्लेषण (analysis) करतात. त्यांना निश्चितच माहीत असतं की आत्मपरीक्षणाशिवाय जगलेलं आयुष्य कधीही हाताबाहेर जाऊ शकतं . तुमच्या अनुभवांच्या आत्मपरिक्षणातून तुम्हांला स्वतःबद्दलची जागरूकता येते. तुम्ही कसे वागलात ,काय केलंत आणि तुम्ही वास्तवात कसे आहात याचं परीक्षण खरंच गरजेचं आहे.
स्व-प्रशिक्षक (सेल्फ कोच) त्यांच्या पूर्वग्रहांना, पूर्वानुभवांना मागेे सोडून, त्यांच्यावरील दृढविश्वासाला सोडून नव्या जाणिवांना सामोरे जातात. स्वतःच्या आजपर्यंतच्या विकसित झालेल्या श्रद्धांना सोडून नव्या शिकवणीला सहजतेने स्वीकारतात.
3. स्व-प्रतिबिंबित वेळ निर्धारित करा:
स्व-प्रशिक्षक (Self Coach) बऱ्याचदा स्वतःबरोबर एकटाच वेळ घालवतो. कधी ते ध्यान असू शकतं, कधी तो रोजचा व्यायाम असू शकतो ,कधी मॉर्निंग वॉक असू शकतो तर कधी ते स्वतःचे अनुभव, घटना कागदावर उतरवणे असू शकते. सेल्फ कोचिंग करणारी व्यक्ती असल्या वैयक्तिक वेळेला स्वतःला रिचार्ज करण्यासाठी वापरते.त्यातून स्वतःची दिशा,स्वतःचा उत्साह आणि वैयक्तिक जागरूकता मिळवते. पीक परफॉर्मर बनण्यासाठी देखील हा वेळ महत्वाचा आहे.
4. रोज डायरी लिहा:
स्व-प्रशिक्षक हे नेहमीच स्वतःच्या आरशात बघून शिकतात. स्वतःच्या जीवन प्रवासाबद्दल, अनुभवांबद्दल लिहून काढलं की विचारशक्तीला चालना मिळते. स्वतःबद्दलची जागरूकता वाढते. स्वतःच्या कृतींना मागे वळून पाहण्याची सवय स्व-प्रशिक्षकांना फायद्याची ठरते. स्वतःच्या वागण्यातल्या, विचारसरणीतल्या सुधारणा पाहून त्यांचा आत्मविश्वास बळावतो.
5. तुमची शिकवण कृतीत आणा:
तुमच्या ज्ञानाची ताकद जबरदस्त असते. तुमचं ज्ञान कृतीमध्ये आणलंत तर ते अधिकच ताकदवान बनते. कृतीशिवाय असलेले ज्ञान हे कधीच जगाला बदलू शकत नाही.
पीक परफॉर्मर हे नेहमीच स्वतःच्या ज्ञानाला कृतीत आणतात आणि त्यांच्यासाठी वैयक्तिकरीत्या अर्थपूर्ण असलेल्या गोष्टींवर कृतीत आणण्याची रणनीती (strategies) विकसित (develop) करतात. स्व-प्रशिक्षक (सेल्फ कोच) या बदलांच्या प्रक्रियेला उच्च प्राधान्य देतात
तर मग सेल्फ कोचिंगची दहा यशस्वी धोरणे वापरून पीक परफॉर्मर बनण्यासाठी येत्या आठवड्यात तुम्ही कोण कोणत्या कृती कराल
1. स्वतःबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी तुम्ही कोणती यंत्रणा विकसित कराल ?
2. स्वतःच्या तुमच्या सेल्फ कोचिंगच्या शोधात तुम्हांला मदत करण्यासाठी कुणाबरोबर भागीदारी करू शकता?
3. तुम्ही स्वतः बद्दल जे काही शिकलात त्याचं तात्काळ उपयुक्त कृतीत कसं रूपांतर कराल?
या प्रश्नांच्या उत्तरात तुम्हांला तुमच्या मधला पीक परफॉर्मर निश्चित सापडेल याची मला खात्री आहे.
माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनःपूर्वक आभार. माझा हा ब्लॉग आवडल्यास लाईक,शेअर, कमेंट करा. माझ्या
FB पेज:www.facebook.com/KirtiSelfCoach/
FB ग्रुप: https://www.facebook.com/groups/823092068235568/?ref=share
च्या लिंक वर क्लिक करून सेल्फ कोचिंग च्या प्रवासात मला जॉईन करा.
धन्यवाद!






Good blog Kirti
उत्तर द्याहटवाThank you Swati
हटवाThank you kirti tai.uttam blog ahe.mi sadhya meditation var jast bhar det ahe.
उत्तर द्याहटवाThank you for sharing your experience.
हटवावाह, very systematic and good points which should be implemented
उत्तर द्याहटवाThank you Manjusha Ma'am
हटवाAwesome tips!!!
उत्तर द्याहटवाThank you Rashmi
हटवाखुप सुंदर ब्लॉग कीर्ती ताई
उत्तर द्याहटवाछान मार्गदर्शन केलंत
Thank you
Thank you Uchita
हटवाखुपच छान आणि महत्वाच्या टिप्स लिहिल्या आहेत यामुळे प्रत्येकालाच आत्म विकसित करण्यासाठी फायदा होईल. 🙏🙏
उत्तर द्याहटवाKhupach sunder blog kirti tai 👏🏻
उत्तर द्याहटवाKeep it up kirti
उत्तर द्याहटवाखुप सुन्दर ब्लॉग...
उत्तर द्याहटवाखुप सखोल आणि उपयुक्त टिप्स आहेत.
खुप छान वाटले वाचुन
मन प्रसन्न झाले
खूप छान ! खरंच अंतर्मनात डोकावणे खूप आवश्यक . त्यासाठी छान टिप्स दिल्यात . थँक यु कीर्ती मम्
उत्तर द्याहटवा