तुमच्या आयुष्यात सध्या कोरोनामुळे बरेच चढ उतार निर्माण झाले आहेत ना? मनाजोगतं वागायला मिळत नाही आहे ना ? नोकरीधंद्यात सगळी उलथापालथ चालली आहे ना ? कोरोनाने संक्रमित होण्याच्या एका अनामिक भीतीचं सावट तुमच्या मनावर आहे ना? ह्या सगळ्या गोष्टींनी कधी तुमचं मन बेचैन होतंय, कधी धास्तावात,  कधी वैतागतय , तर कधी हताश होतय आणि परिस्थिती कशी हाताळायची  हेच  तुम्हाला उमगत नाही आहे . लाईफ मधल्या या आणि यासारख्या  कितीतरी अजून सिच्युएशन्स  प्रभावी पद्धतीने  कशा हाताळायच्या आणि आयुष्य अधिक एंजॉयेबल कसं बनवायचं  ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये  हे सांगणार आहे. तर  माझा हा ब्लॉग  शेवटपर्यंत वाचा.

 कोरोना मधलंच उदाहरण घ्यायचं झालं  तर लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पुढचे चार महिने  माझा मुलगा  दिल्लीत एकटाच होता आणि आम्ही बाकी सगळे बंगलोरमध्ये. दिल्लीत दिवसोंदिवस कोरोनाच्या केसेस वाढत होत्या त्याचबरोबर  दर चार-पाच दिवसांनी भूकंपाचे धक्के बसत होते. विचार करा, अशा परिस्थितीत कसं वाटत असेल  एका आईला!! पण मी माझ्या  काळजीत पडलेल्या मनाशी  संवाद साधला  आणि स्वतःला  शांत राहणं  'शिकवलं',  यालाच म्हणतात  सेल्फ कॉचींग  टेक्निक. अशा सगळ्या सिच्युएशन्स जेव्हा लाईफ मध्ये येतात तेव्हा तुमच्याकडे, माझ्याकडे... आपल्या सगळ्यांकडे दोन ऑप्शन्स असतात. एक आजूबाजूची परिस्थिती, जागा ,माणसं ,वस्तू बदलणे पण जेव्हा कोरोनासदृश्य परिस्थितींमध्ये हे शक्य होत नाही तेव्हा एकच चॉईस असतो तो म्हणजे स्वतःला बदलणे. चेंज (CHANGE) हा निसर्गाचा नियमच आहे. हा चेंज (CHANGE) सहजरित्या कसा आणावा आणि तुमच्या फायद्यासाठी तो कसा वापरावा हे तुम्हाला सेल्फ कॉचींग टेक्निक ने शक्य होतं .हे सेल्फ कोचिंग टेक्निक मी माझ्या life मध्ये नियमित वापरते आणि त्यामुळे माझं  life अधिक एफ्फेक्टिव्ह आणि एंजॉयेबल होते.मी कीर्ती मिलिंद सहानी, तुमची सेल्फ कोचिंग कोच, येत्या तीन वर्षात कमीत कमी दहा हजार लोकांना सेल्फ कोच करून त्यांचे life  अधिक आनंदी, संतुलित ,समाधानी आणि अधिक प्रॉडक्टिव्ह  बनवण्याचा माझा ध्यास आहे.

आयुष्य हे आजकाल खूप गुंतागुंतीचं आणि तणावपूर्वक झालेलं आहे. तुम्हांला तुमच्या आयुष्यात स्वतःला,फॅमिलीला आणि कामाला कसं बॅलन्स करायचं ते जमत नाही. कुठल्या गोष्टीला किती आणि केव्हा प्रायोरिटी द्यायची हे समजत नाही आणि त्यामुळे फ्रस्ट्रेशन येतं .तुमच्या स्वतःच्या स्वप्नांना आयुष्यात जागाच रहात नाही.तुमचे कामावरचे आणि परिवारातले नातेसंबंध सांभाळताना तुमची कुठे तरी कुचंबणा  होत असते आणि अशा ह्या सगळ्या मानसिक ताणतणावांमुळे तुमची हेल्थ बिघडायला सुरुवात होते. तुमची आयुष्य  जगण्याची मजाच निघून जाते.शेवटी बऱ्याच गोष्टींमधले तुमचे प्रयत्न तुम्ही कायमचे सोडून देता आणि ह्या गोष्टीचं पण तुम्हांला वाईट वाटायला लागतं. या सगळ्या दृष्टचक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे सेल्फ कोचींग टेक्निक . ह्या टेक्निकमध्ये तुम्ही तुमच्या अंतर्मनाशी संवाद साधायला शिकता . अंतर्मनाचे ऐकणे आणि समजून घेणे गरजेचे आहे. माझं, तुमचं....आपली सगळ्यांचीच अंतर्मने संवाद साधत असतात पण ऐकता का तुम्ही त्याचं नेहमीच?

आयुष्य खूप सुंदर आहे. तुम्ही तुमच्या आयुष्याच्या पुन्हा एकदा प्रेमात पडू शकता सेल्फ कॉचींग टेक्निकच्या मदतीने. चला तर बघूया सेल्फ कॉचींग टेक्निक फायद्याचे का आहे याची सात महत्वाची कारणे: 

1. फ्री: 

 सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हांला यासाठी कुणाकडे जायला लागत नाही .तुम्हांला स्वतःबरोबरच काम करायचं आहे त्यामुळे कुणाला भरमसाठ पैसे ही द्यायची गरज नाही. पैश्याची मर्यादा नसल्यामुळे तुम्ही आयुष्यभरही ही टेक्निक वापरू शकता .

2. कधीही  कुठेही : 

ह्या साठी तुम्हाला कुठल्याही एका ठराविक वेळेची, ठराविक जागेची गरज लागत नाही. तुम्हाला कुठल्याही वेळेला कुठल्याही जागी कुठल्याही परिस्थितीत हे  टेक्निक वापरता येते. तुमच्या आयुष्यातल्या कुठल्याही प्रसंगात तुम्हांला ह्या टेक्निकचा वापर अगदी लगेच करता येतो .ना सेपरेट रूम पाहिजे ना कुठल्या इक्विपमेंटची गरज .


3. सेल्फ अवेअरनेस : 

ह्या टेक्निकमध्ये तुम्ही स्वतःशी संवाद  साधता आणि त्यातून तुम्हाला स्वतःबद्दलची भरपूर माहिती नव्याने समजते. तुम्हांला तुमच्या आवडीनिवडी ,तुमच्या स्ट्रेंग्थस ,तुमच्या कमतरता, तुमची स्वप्ने, तुमची अद्वितीय गुणवत्ता यांबद्दल नव्यानेच अनुभूती होते. यातूनच तुम्हांला तुमच्या आयुष्याला  वेगळं वळण देणे सोपं जातं. 

4. सेल्फ कंट्रोल :


ह्या टेक्निक मध्ये सगळ्या स्टेप्स घेणं तुमचाच  हातात असते.  कुणीही  तुमच्यावर  त्याचं कंपल्शन करू शकत नाही.तुम्ही किती आणि कुठल्या लेवलवर प्रयत्न करायचे  ते तुमचं तुम्ही ठरवू शकता.त्यामुळे यश हे तुमच्याच हातात असते आणि जे बदल तुम्ही घडवता ते एंजॉयेबल  होतात.

5. आत्मविश्वास : 

ही टेक्निक वापरून जेव्हा तुम्हांला यश  मिळते तेव्हा हा प्रवास तुम्हांला  एक वेगळाच आत्मविश्वास देतो. स्वतःच्याच प्रयत्नांमधून जेव्हा तुम्ही परिस्थिती वर मात करायला लागता , तुमची स्वप्नं पूर्ण करायला लागता तेव्हा जीवन जगण्याची एक नवी उमेद तुम्हाला मिळते. तुमच्या वाढलेल्या आत्मविश्वासाने तुमची आत्मप्रतिमा देखील उंचावते. तुमचं आयुष्य एका वेगळ्या लेवलवर जातं.

6. ऑटो रिस्पॉन्स : 



ही टेक्निक तुम्ही तुमच्या आयुष्यात जेव्हा नियमित वापरायला लागाल आणि लाईफ मधल्या सगळ्या सिच्युएशन्स या टेक्निकचा वापर करून हँडल करायला लागाल तेव्हा परिस्थितींना तुमच्याकडून ऑटोमॅटिक रिस्पॉन्स मिळायला लागतील. हे ऑटोमॅटिक रिस्पॉन्स तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग बनतील. तुमच्या पावरफूल सवयी (habits) बनतील. तुमचे संघर्ष कमी व्हायला लागतील.

7. मार्गदर्शक: 

 तुम्ही जेव्हा ही टेक्निक वापरून स्वतःच तुमचं आयुष्य प्रभावी पद्धतीने हाताळू लागाल तेव्हा तुम्हांला तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा मार्गदर्शक बनता येईल. तुमच्या मुलांना, घरातल्या इतर नातेवाईकांना, आपल्या लाईफ पार्टनर ला तुम्ही सहज  मार्गदर्शन  करू शकाल. तुमच्या नोकरीधंद्यात  जे तुमच्यावर अवलंबून असतात  त्यांनाही तुम्ही प्रभावी पद्धतीने परिस्थिती कशी हाताळायची याचं मार्गदर्शन करु शकाल. त्यांचं यशस्वी नेतृत्व करू शकाल आणि या सगळ्यांचा फायदा तुम्हाला तुमचं स्वतःचं लाईफ संतुलित, समाधानी, यशस्वी आणि अधिक प्रॉडक्टिव बनवायला होईल.

https://www.sitepoint.com/7-steps-to-effectively-coaching-yourself/

 अशा पद्धतीने सेल्फ कॉचींग टेक्निक तुमच्या आयुष्यातल्या अवघड परिस्थितीमध्ये तुमचा एक मित्र बनून  तुम्हाला साथ देते. तुमचा आत्मविश्वास, तुमची आत्मप्रतिमा वाढायला मदत करते. तुम्हाला आत्मनिर्भर बनवते. तुम्हाला तुमच्या आयुष्याचा हिरो बनवते.

 माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद .हा ब्लॉग तुम्हांला आवडला असेल तर प्लीज लाईक,कमेंट करा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रभावी सेल्फ कोचिंग टेक्निक चा वापर करायचा असेल आणि त्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर माझ्या एफबी पेजच्या लिंक वर जरूर क्लिक करा www.facebook.com/KirtiSelfCoach/






टिप्पण्या

  1. Nice thoughts Madam. Moreover the words are from the pains you have gone through. So the blog is lively.

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच सुंदर ब्लॉग लिहिला आहेत ताई
    उपयुक्त मार्गदर्शन

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

4 महत्त्वाचे घटक जे वाढवतात तुमची आंतरिक प्रेरणा