कोरोना मधलंच उदाहरण घ्यायचं झालं तर लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पुढचे चार महिने माझा मुलगा दिल्लीत एकटाच होता आणि आम्ही बाकी सगळे बंगलोरमध्ये. दिल्लीत दिवसोंदिवस कोरोनाच्या केसेस वाढत होत्या त्याचबरोबर दर चार-पाच दिवसांनी भूकंपाचे धक्के बसत होते. विचार करा, अशा परिस्थितीत कसं वाटत असेल एका आईला!! पण मी माझ्या काळजीत पडलेल्या मनाशी संवाद साधला आणि स्वतःला शांत राहणं 'शिकवलं', यालाच म्हणतात सेल्फ कॉचींग टेक्निक. अशा सगळ्या सिच्युएशन्स जेव्हा लाईफ मध्ये येतात तेव्हा तुमच्याकडे, माझ्याकडे... आपल्या सगळ्यांकडे दोन ऑप्शन्स असतात. एक आजूबाजूची परिस्थिती, जागा ,माणसं ,वस्तू बदलणे पण जेव्हा कोरोनासदृश्य परिस्थितींमध्ये हे शक्य होत नाही तेव्हा एकच चॉईस असतो तो म्हणजे स्वतःला बदलणे. चेंज (CHANGE) हा निसर्गाचा नियमच आहे. हा चेंज (CHANGE) सहजरित्या कसा आणावा आणि तुमच्या फायद्यासाठी तो कसा वापरावा हे तुम्हाला सेल्फ कॉचींग टेक्निक ने शक्य होतं .हे सेल्फ कोचिंग टेक्निक मी माझ्या life मध्ये नियमित वापरते आणि त्यामुळे माझं life अधिक एफ्फेक्टिव्ह आणि एंजॉयेबल होते.मी कीर्ती मिलिंद सहानी, तुमची सेल्फ कोचिंग कोच, येत्या तीन वर्षात कमीत कमी दहा हजार लोकांना सेल्फ कोच करून त्यांचे life अधिक आनंदी, संतुलित ,समाधानी आणि अधिक प्रॉडक्टिव्ह बनवण्याचा माझा ध्यास आहे.
आयुष्य हे आजकाल खूप गुंतागुंतीचं आणि तणावपूर्वक झालेलं आहे. तुम्हांला तुमच्या आयुष्यात स्वतःला,फॅमिलीला आणि कामाला कसं बॅलन्स करायचं ते जमत नाही. कुठल्या गोष्टीला किती आणि केव्हा प्रायोरिटी द्यायची हे समजत नाही आणि त्यामुळे फ्रस्ट्रेशन येतं .तुमच्या स्वतःच्या स्वप्नांना आयुष्यात जागाच रहात नाही.तुमचे कामावरचे आणि परिवारातले नातेसंबंध सांभाळताना तुमची कुठे तरी कुचंबणा होत असते आणि अशा ह्या सगळ्या मानसिक ताणतणावांमुळे तुमची हेल्थ बिघडायला सुरुवात होते. तुमची आयुष्य जगण्याची मजाच निघून जाते.शेवटी बऱ्याच गोष्टींमधले तुमचे प्रयत्न तुम्ही कायमचे सोडून देता आणि ह्या गोष्टीचं पण तुम्हांला वाईट वाटायला लागतं. या सगळ्या दृष्टचक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे सेल्फ कोचींग टेक्निक . ह्या टेक्निकमध्ये तुम्ही तुमच्या अंतर्मनाशी संवाद साधायला शिकता . अंतर्मनाचे ऐकणे आणि समजून घेणे गरजेचे आहे. माझं, तुमचं....आपली सगळ्यांचीच अंतर्मने संवाद साधत असतात पण ऐकता का तुम्ही त्याचं नेहमीच?
आयुष्य खूप सुंदर आहे. तुम्ही तुमच्या आयुष्याच्या पुन्हा एकदा प्रेमात पडू शकता सेल्फ कॉचींग टेक्निकच्या मदतीने. चला तर बघूया सेल्फ कॉचींग टेक्निक फायद्याचे का आहे याची सात महत्वाची कारणे:
1. फ्री:
सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हांला यासाठी कुणाकडे जायला लागत नाही .तुम्हांला स्वतःबरोबरच काम करायचं आहे त्यामुळे कुणाला भरमसाठ पैसे ही द्यायची गरज नाही. पैश्याची मर्यादा नसल्यामुळे तुम्ही आयुष्यभरही ही टेक्निक वापरू शकता .
2. कधीही कुठेही :
ह्या साठी तुम्हाला कुठल्याही एका ठराविक वेळेची, ठराविक जागेची गरज लागत नाही. तुम्हाला कुठल्याही वेळेला कुठल्याही जागी कुठल्याही परिस्थितीत हे टेक्निक वापरता येते. तुमच्या आयुष्यातल्या कुठल्याही प्रसंगात तुम्हांला ह्या टेक्निकचा वापर अगदी लगेच करता येतो .ना सेपरेट रूम पाहिजे ना कुठल्या इक्विपमेंटची गरज .
ह्या टेक्निकमध्ये तुम्ही स्वतःशी संवाद साधता आणि त्यातून तुम्हाला स्वतःबद्दलची भरपूर माहिती नव्याने समजते. तुम्हांला तुमच्या आवडीनिवडी ,तुमच्या स्ट्रेंग्थस ,तुमच्या कमतरता, तुमची स्वप्ने, तुमची अद्वितीय गुणवत्ता यांबद्दल नव्यानेच अनुभूती होते. यातूनच तुम्हांला तुमच्या आयुष्याला वेगळं वळण देणे सोपं जातं.
4. सेल्फ कंट्रोल :
5. आत्मविश्वास :
ही टेक्निक वापरून जेव्हा तुम्हांला यश मिळते तेव्हा हा प्रवास तुम्हांला एक वेगळाच आत्मविश्वास देतो. स्वतःच्याच प्रयत्नांमधून जेव्हा तुम्ही परिस्थिती वर मात करायला लागता , तुमची स्वप्नं पूर्ण करायला लागता तेव्हा जीवन जगण्याची एक नवी उमेद तुम्हाला मिळते. तुमच्या वाढलेल्या आत्मविश्वासाने तुमची आत्मप्रतिमा देखील उंचावते. तुमचं आयुष्य एका वेगळ्या लेवलवर जातं.
6. ऑटो रिस्पॉन्स :
7. मार्गदर्शक:
तुम्ही जेव्हा ही टेक्निक वापरून स्वतःच तुमचं आयुष्य प्रभावी पद्धतीने हाताळू लागाल तेव्हा तुम्हांला तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा मार्गदर्शक बनता येईल. तुमच्या मुलांना, घरातल्या इतर नातेवाईकांना, आपल्या लाईफ पार्टनर ला तुम्ही सहज मार्गदर्शन करू शकाल. तुमच्या नोकरीधंद्यात जे तुमच्यावर अवलंबून असतात त्यांनाही तुम्ही प्रभावी पद्धतीने परिस्थिती कशी हाताळायची याचं मार्गदर्शन करु शकाल. त्यांचं यशस्वी नेतृत्व करू शकाल आणि या सगळ्यांचा फायदा तुम्हाला तुमचं स्वतःचं लाईफ संतुलित, समाधानी, यशस्वी आणि अधिक प्रॉडक्टिव बनवायला होईल.
https://www.sitepoint.com/7-steps-to-effectively-coaching-yourself/
अशा पद्धतीने सेल्फ कॉचींग टेक्निक तुमच्या आयुष्यातल्या अवघड परिस्थितीमध्ये तुमचा एक मित्र बनून तुम्हाला साथ देते. तुमचा आत्मविश्वास, तुमची आत्मप्रतिमा वाढायला मदत करते. तुम्हाला आत्मनिर्भर बनवते. तुम्हाला तुमच्या आयुष्याचा हिरो बनवते.
माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद .हा ब्लॉग तुम्हांला आवडला असेल तर प्लीज लाईक,कमेंट करा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रभावी सेल्फ कोचिंग टेक्निक चा वापर करायचा असेल आणि त्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर माझ्या एफबी पेजच्या लिंक वर जरूर क्लिक करा www.facebook.com/KirtiSelfCoach/








Nice thoughts Madam. Moreover the words are from the pains you have gone through. So the blog is lively.
उत्तर द्याहटवाThank you Sir
हटवाVer nicely put
उत्तर द्याहटवाThank you so much
हटवाKhup sundae lihila ahe mam
उत्तर द्याहटवाThank you Harshali
हटवाखूप छान लिहिला आहे ताई
उत्तर द्याहटवाधन्यवाद अल्का ताई
हटवाखूपच सुंदर ब्लॉग लिहिला आहेत ताई
उत्तर द्याहटवाउपयुक्त मार्गदर्शन
Thank you Uchit
हटवाखूप छान किर्तीताई👍👍👌👌👌
उत्तर द्याहटवाVery Nicely put up thoughts. Thought provoking. Looking forward to your next edition
उत्तर द्याहटवाThank you Milind
हटवाKhup chan lihila aahe . Self experience takun personal touch aala aahe . Keep it up 👍
उत्तर द्याहटवाखूप सुंदर लिहिले आहे 👍👌
उत्तर द्याहटवाखूप सुंदर आणि उपयोगी ब्लॉग आहे.
उत्तर द्याहटवा